जिल्ह्यात भूजल पातळी एक मीटरने घटली...! कोल्हापूरातही परिस्थिती चिंताजनक; पाण्याची काटकसर हाच उपाय
भूजल सर्व्हेक्षणचा फोटो वापरावा
संतोष पाटील कोल्हापूर
अपुरा पाऊस आणि प्रचंड पाणी उपसा यामुळे कोल्हापूर जिह्यातील भूजल पातळी कमालीची घटली आहे. ही पातळी एक मीटरने घटली आहे. एक मीटरची घट ही धोक्याची समजली जाते. त्यातही चंदगड, शिरोळ आणि करवीर तालुके डेंजर झोनमध्ये आहेत. चंदगड -0.92, शिरोळ -0.78, करवीर -0.68 अशी पातळी खाली आली आहे. जिह्यातील सरासरी -0.65 इतकी घटली आहे. फेब्रुवारीनंतर उन्हाचा तीव्र कडाका जाणवू लागल्याने भूजल पातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
जलयुक्त शिवार योजना आणि कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या पुनर्भरण योजनामुळे भूजल पातळी वाढू शकते, मात्र त्यासाठी काही काळ जाण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात अपुऱ्या पाणी साठ्यामुळे दुष्काळात राज्य होरपळण्याची शक्यता आहे. जिह्यालाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पाण्याच्या उपश्यावर बंधने येऊ शकतात. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे पाण्याचा उपसा होत असल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा भूजल पातळीवर नजर ठेवून आहे.
चंदगड-गडहिंग्लज तालुक्यातील भूजल पातळी कमालीची -0.96 घटली आहे. चंदगडमधील 5 वर्षांतील सरासरी पातळी 8.15 मीटरइतकी आहे. शिरोळतील सरासरी पातळी 4.84 मीटर आहे. करवीरमध्ये मोठे पर्जनमान असले तरी तेथील भूजल पातळी घसरली आहे. करवीरमधील 5 वर्षांतील सरासरी भूजल पातळी 3.61 मीटर आहे. ती 4.41 मीटरवर पोहोचली आहे.
जिह्यात गेल्या 25 वर्षांत दूधगंगा, वारणा धरणाची कामे पूर्ण झाली आहेत. छोटी धरणे, बंधारे झाल्याने कोल्हापूरची भूजल पातळी ही विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेत चांगली आहे. पण गेल्या काही वर्षांत प्रथमच उणेमध्ये भूजल पातळी घटली आहे. पावसानंतर या पातळीत सुधारणा होऊ शकते. कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाच्यावतीने पुनर्भरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानांमुळे पातळीत जादा वाढ होण्याची शक्यता आहे.
भरमसाठ वापराच्या जोडीला पाणीबाणी
चार मोठी धरणे, 8 मध्यम तर 53 लघु प्रकल्प, 453 गाव तलाव, 103 पाझर तलाव, 61 हजार बोअरवेल, 327 झरे, 4167 हातपंप, 1847 शेत व्िाहिरी, 987 सार्वजनिक विहिरी, 939 बोअरवेल योजना यातून तब्बल सव्वाशे टीएमसीपेक्षा अधिकचा पाणी साठा जिह्यात होतो. जून-जुलै ते ऑक्टोबर-सप्टेंबर हे हमखास पावसाचे दिवस असतात. निव्वळ जलसाक्षरता आणि नियोजनाच्या अभावामुळे एका बाजूला भरमसाठ पाणी वापर तर पाणीबाणी स्थितीत काटकसर अशी व्दिधा स्थिती कोल्हापूरची आहे.
जलसाक्षरतेची गरज
कोल्हापुरात किमान चार महिने हमखास पडणारा पाऊस जिह्याला जलसमृध्द करुन जातो. शेती, उद्योग पिण्यासाठी मिळून साधारण 60 टीएमसीची वार्षिक गरज असूनही निव्वळ नियोजनाच्या दुष्काळामुळे उन्हाळ्यातील दोन महिने पाण्यासाठी काटकसर करावी लागत् आहे. पावसाळ्यानंतर दोनच महिन्यात 30 टक्के जलसाठे कृत्रिम कारणाने प्रदूषीत झाल्याने पिण्यायोग्य राहत नाहीत. पाणीखाऊ पिके, वारेमाप वापर, जलप्रदुषणावर नदी प्रवाहित ठेवण्याचा जुनाट उपाय यामुळे जिह्यात एप्रिल-मे महिना घसा कोरड करणारा ठरतो. जलप्रदुषण रोखणे, शेतीसाठी ठिबकचा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन, नवनवीन पिकांची निवड, जलसाक्षरता प्रभावीपणे राबवली तरच जलस्त्राsतांचे पावित्र राखून पाण्याचा योग्य आणि पुरेसा उपयोग होईल.
पाण्याचा वार्षीक वापर (टीएमसीमध्ये)
शेती- 50.4
पिण्यासाठी - 4.26
उद्योग- 2.1