महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

10:04 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे येणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळीकडे हनुमान जयंती साजरी होत असताना रायगडावर चैत्रपौर्णिमा या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची जाणीव हिंदू समाजाला व्हावी यासाठी शिवप्रतिष्ठानच्यावतीने अभिवादन करण्यात आले. विधीवतपणे शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. अर्जुन शिंदे व पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरप्रमुख अनंत चौगुले, विभागप्रमुख चंद्रकांत चौगुले, किरण बडवाण्णाचे, अंकूश केसरकर, गजानन निलजकर, विजय कुंटे, मारुती पाटील, अमित पेडणेकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

शिवसेनेतर्फे अभिवादन

Advertisement

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने छ. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी उद्यान येथे अभिवादन करण्यात आले. तानाजी पावशे व प्रकाश राऊळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, राजू तुडयेकर, प्रदीप सुतार, प्रकाश हेब्बाजी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article