For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

12:10 PM Apr 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने येथील बौध्द विहार येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.डॉ. बाबासाहेबांन सारखे युगपुरुष अनेक शतकात एकदाच जन्माला येतात आणि पुढील अनेक शतकासाठी प्रेरणा देऊन जातात. अनेक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी मानवी हक्क, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित भारतीय संविधान निर्माण केले. डॉ. बाबासाहेबांचे विचार कुठल्या एका जातीच्या धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते अखिल मानव जातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमधे आहे. आजच्या या महत्वपूर्ण दिवशी आपण संविधानाच्या मूल्यांचा पुन्हा एकदा संकल्प करूया समाज परिवर्तन ,सामाजिक समता, आणि बंधुभावाची जोपासना करण्याचा निश्चय करूया, असे अबिद नाईक म्हणाले.यावेळी बुद्ध विहार अध्यक्ष अंकुश कदम, उपाध्यक्ष परशुराम कदम, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष गणेश चौगुले, युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, शहर सरचिटणीस सचिन अडुळकर, तालुका खजिनदार राजू वर्दम, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, सत्य विजय परब, तालुका चिटणीस मुश्ताक काझी, तालुका प्रतिनिधी सईद काझी,सलीम शेमना, उदय सावंत, जाहीर फकीर, बाळू मेस्त्री, अली नाईक, पदवीधर सेल मतदारसंघ अध्यक्ष महेश चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस,बाबा साळवी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.