ग्रीन वॉरिअर्स संघाकडे हिंडाल्को चषक
हिंडाल्को प्रीमीअर लीग :उपविजेता ओशन प्रीडेटर्स
वार्ताहर/काकती
हिंडाल्को इंडस्ट्रीज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंडाल्को प्रीमीअर लीग सेशन-3 क्रिकेट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत आठ संघांनी प्रत्येकी दोन गटात भाग घेतला होता. अंतिम सामना ग्रीन वॉरिअर्स संघ विरुद्ध ओशन प्रीडेटर्स संघ यांच्यात रोमहर्षक झाला.यात ग्रीन वॉरिअर्स संघाने विजेते पद पटकविले तर ओशन प्रीडेटर्स उपविजेता संघ ठरला. या स्पर्धेतील सामनावीर विशाल एस., सर्वोत्कृष्ट फलंदाज यल्लाप्पा बेळगावकर, उत्कृष्ट गोलंदाज प्रवीण खन्नूकर, विशाल संभाजीचे, उद्योन्मुख खेळाडू समर्थ यांनी विशेष यश संपादन केले आहे. या संघातून खेळण्यात आलेल्या प्रायोजित देणगीची रक्कम महिला अभिवृद्धी आणि सुरक्षा संस्था, ही संस्था देवदासीच्या विकास आणि सुधारणेसाठी कार्य करते तर समृद्धी वेलफेअर फॉर डिसायएबल बेळगाव ही संस्था अंध व दिव्यांगसाठी कार्य करते. या दोन्ही संस्थांना प्रत्येक 1 लाख रुपये प्रमाणे 2 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे.बक्षिस वितरण कौशिकी मिश्रा, मयुर कृष्णा, प्रदीप त्रिपाठी, सुहास सी.ए आशीश मिश्रा आदींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एनजीओचे प्रतिनिधी दिनेश नाईक उपस्थित होते.