For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघवडे-मच्छे रस्त्याच्या दुरुस्तीला हिरवा कंदील

10:09 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
वाघवडे मच्छे रस्त्याच्या दुरुस्तीला हिरवा कंदील
Advertisement

म. ए. युवा समितीच्या मागणीची ‘सार्वजनिक बांधकाम’कडून दखल

Advertisement

वार्ताहर /किणये

वाघवडे-मच्छे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाचे या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर या तक्रारीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने मच्छे-वाघवडे रस्त्याची लवकरच दुरुस्ती करणार असल्याचे पत्रक युवा समितीला दिले आहे. मच्छे-वाघवडे रस्त्यावरखड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. मच्छे-वाघवडे रस्त्याच्या बाजूला औद्योगिक वसाहत असल्याने कारखान्यांना कामगार वर्ग याच रस्त्यावरुन ये-जा करीत असतो. रात्रीच्यावेळी खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे बरेच दुचाकीस्वार खड्यामध्ये पडून जखमी झालेले आहेत.

Advertisement

निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी

गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खाते व प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. रस्त्याबद्दल दैनिक ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून आवाज उठविण्यात आला. तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने बांधकाम खात्याकडे तक्रार दाखल केली होती. अखेर या तक्रारीची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाला टेंडर व इतर कामकाज लवकर पूर्ण करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

तरुणांनी आवाज उठविला पाहिजे

ग्रामीण भागातील बऱ्याच गावांना जाणारे संपर्क रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यांकडे प्रशासन साफ दुर्लक्ष करीत आहेत. रस्यावरून रोज शेकडो वाहनधारक ये-जा करीत असतात. मात्र यासंदर्भात कोणीही आवाज उठवित नाहीत. त्या त्या भागातील तरुणांनी आपल्या नागरी समस्यांसाठी आवाज उठविणे गरजेचे आहे. मच्छे-वाघवडे रस्त्यांसंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेण्यात आली आहे. पेंद्र सरकारच्या फंडातून निधी मंजूर झाला आहे. लवकरच याचे कामकाज सुरू होणार आहे.

- साईनाथ शिरोडकर, म. ए. युवा समिती

Advertisement
Tags :

.