For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएल सामन्यांसाठी हिरवा कंदील

07:30 AM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयपीएल सामन्यांसाठी हिरवा कंदील
Advertisement

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची माहिती

Advertisement

बेंगळूर : आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धा भरविण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, स्पर्धा भरविताना सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेण्याच्या खबरदारींसाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालातील शिफारसींनुसार नियमांचा अवलंब करून राज्य सरकारने आयपीएल स्पर्धा खेळवण्यास होकार दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयपीएल स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी दिली.

गुरुवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आयपीएल सामन्यांच्या आयोजनाबाबत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती जॉन मायकल डी कुन्हा यांच्या आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे त्यांनी केलेल्या शिफारसींबद्दल आमच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करायचे असतील तर जॉन मायकल डी कुन्हाच्या शिफारशींचे पालन करावे, असे सुचवण्यात आले होते. त्यानुसार केएससीएने आधीच काम सुरू केले आहे.

Advertisement

अल्पकालीन सूचना लागू करण्यात आल्या आहेत. मागील आयपीएल चॅम्पियन संघाच्या होम ग्राउंडवर यंदाची आयपीएल स्पर्धा सुरू करण्याची प्रथा आहे. त्यानुसार, आरसीबी आणि केएससीएने यावेळी आयपीएलचा उद्घाटन सामना बेंगळूरमध्ये आयोजित करण्याची विनंती केली होती, असेही गृहमंत्री परमेश्वर यांनी स्पष्ट पेले. या संदर्भात, सरकारने जीबीए अध्यक्ष, पोलीस आयुक्त आणि विविध खात्यांच्या उपस्थितीत एक समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर केला होता. आम्ही मंत्रिमंडळात या अहवालातील विषयांवर चर्चा सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आम् ही अंतिम निर्णय जाहीर केला आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.