तीन वंदे भारत टेनना मोदींकडून हिरवा झेंडा
उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूशी संपर्क यंत्रणा मजबूत
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (31 ऑगस्ट) 3 नवीन वंदे भारत टेनला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या तीन टेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळूर आणि मेरठ ते लखनौ दरम्यान धावतील. यावेळी पंतप्रधानांनी वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. आज प्रत्येक मार्गावर वंदे भारतची मागणी होत आहे. सध्या देशभरात 102 वंदे भारत टेन धावत आहेत. या गाड्यांमधून 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे, असे गौरवाने सांगितले.
वंदे भारत गाड्या 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या देशात 100 हून अधिक वंदे भारत गाड्या धावत आहेत. वंदे भारत टेनचे मार्ग देशातील 280 हून अधिक जिह्यांना जोडत आहेत. वंदे भारत टेन्समुळे प्रदेशातील लोकांना वेगवान आणि आरामदायी प्रवासासोबत जागतिक दर्जाच्या गाड्यांचा अनुभव मिळत आहे. ह्या रेल्वे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवण्यात आल्या असून त्यात कवच तंत्रज्ञान, 360 डिग्री फिरणाऱ्या खुर्च्या, आणि एकात्मिक ब्र्रेल संकेत अशा अत्याधुनिक सुविधा आहेत.