For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरित ऊर्जा गलियारा-3 ला केंद्राची मंजुरी; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

10:36 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
हरित ऊर्जा गलियारा 3 ला केंद्राची मंजुरी  केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
Advertisement

नवी दिल्ली : हरित ऊर्जा गलियारा तिसरा टप्पा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय वीज आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तब्बल 1.86 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली ही योजना भारताच्या स्वच्छ आणि हरित ऊर्जा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Advertisement

या योजनेअंतर्गत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अंतर्गत राज्य पारेषण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे 135 गिगावॅटपर्यंतची नवीकरणीय ऊर्जा वीज ग्रीडशी जोडून ती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.

देशात सौर आणि पवन ऊर्जेची क्षमता सातत्याने वाढत असताना ही ऊर्जा राष्ट्रीय वीज ग्रीडशी प्रभावीपणे जोडण्यासाठी हरित ऊर्जा गलियारा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मजबूत पारेषण व्यवस्था उभारल्यामुळे नवीकरणीय ऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर करणे शक्य होईल.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वच्छ ऊर्जा, सक्षम वीज ग्रीड तसेच ऊर्जा-सुरक्षित आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे नाईक यांनी नमूद केले. ही योजना नवीकरणीय ऊर्जेच्या विस्ताराला गती देण्यासोबतच ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे, स्वच्छ विजेची उपलब्धता वाढवणे आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यास हातभार लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी श्रीपाद नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानले.

Advertisement
Tags :

.