For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड मैदानात संदिप मोठेचा शानदार विजय

10:14 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड मैदानात संदिप मोठेचा शानदार विजय
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

कसबा नंदगड येथील व्हनव्वा देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात सांगलीच्या संदीप मोठेने दिल्लीच्या युधिष्ठिरला अवग्या 6 व्या मिनिटाला गदेलोट डावावर चित करून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार विठ्ठल हलगेकर, बिळकी-आवरोळी मठाचे चन्नबसव देवरू, लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, खानापूर तालुका विकास आघाडीचे भरमाणी पाटील, पुंडलिक कारलगेकर, विठ्ठल पाटील, प्रवीण पाटील, म.ए. समितीचे नेते मुरलीधर पाटील व कुस्ती कमिटीच्या पदाधिक्रायांच्या  हस्ते संदीप मोठे सांगली विरुद्ध युधिष्ठिर दिल्ली यांच्यात लावण्यात आली. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत  युधिष्ठिर दिल्ली याने सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संदीप मोठे यांच्यावर एकेरी पटकाडून  संदीपला खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लागलीच हाताचा कस चढविला. पण चालाख संदीप मोठेने युधिष्ठराच्या विळख्यातून सुटका करून घेतली. युधिष्ठिरने पुन्हा मोळी बांधण्याचा प्रयत्न केला. तोही प्रयत्न फसला गेला. 5 व्या मिनिटाला युधिष्ठिरने पुन्हा घुठण्याची पकड घेतली. दोघांच्या झटापटीत संदीप मोठेने जोरदार प्रतिकार करत 6 व्या मिनिटाला गदेलोट डावावर विजय मिळविला. पंच म्हणून दशरथ पाटील व कृष्णा पाटील यांनी काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती संगमेश बिरादार विरुद्ध प्रदीप ठाकूर सांगली यांच्यात लावण्यात आली. ही कुस्ती डावप्रतीडावांनी झुंजली पण वेळेआभावी 22 मिनिटाच्या अटीतटीच्या लढतीनंतर कुस्तीचा  पंचानी कुस्ती बरोबरीत सोडवली.या आखाड्यात प्रकाश इंगळगी, रोहित कंग्राळी, पवन चिकदिनकोप, विक्रम शेनोळी, प्रथमेश कंग्राळी, यलार्लिग आदी पैलवानांनी प्रतिस्पर्धी पैलवानावर विजय मिळविला. आखाड्यात एकापेक्षा एक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या. कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुस्ती शौकीन उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.