For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यपूर्वेतील महाधक्का!

06:03 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यपूर्वेतील महाधक्का
Advertisement

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील तीनपैकी नेमके त्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळाले आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, हेलिकॉप्टरचे पायलट आणि सुरक्षारक्षक प्रवास करत होते. यातील कोणीही वाचण्याची शक्यता नाही. इराण आणि इस्त्रायल दरम्यान वातावरण तापलेले असतानाच मध्यपूर्वेतील हा महाधक्का विचार करायला लावणारा आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी तशी अधिकृत शंकाही कोणी व्यक्त केलेली नाही. इब्राहिम रईसी यांचा जन्म 14 डिसेंबर 1960 रोजी इराणचे मोठे शहर मशहाद येथे झाला होता. याच शहरात शिया इस्लामचे इमाम अली रझा यांचा दर्गा आहे. इराणची एक समृद्ध धार्मिक संस्था अशी त्याची ओळख आहे. रईसी यांचे वडील मौलवी होते. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी नेहमीच शिया परंपरेनुसार काळी पगडी घालताना दिसतात. हे सैय्यद असण्याचं आणि पैगंबर मोहम्मद यांचे वंशज असल्याचं प्रतीक मानलं जातं. विद्यार्थी जीवनात त्यांनी विशेषत: रशिया आणि पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेले इराणचे शाह मोहम्मद रेझा पहलवी यांच्या नेतृत्वाखालील आधुनिक इराणला आजचे कट्टर धर्मवादी इराण बनवण्यासाठी आघाडी घेतली. शाह राजवटी विरोधात त्यांची निदर्शनं आणि अवघ्या 19 व्या वर्षी केलेली भाषणे प्रभावी ठरली  होती. 1979 मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वातील इस्लामी क्रांतीदरम्यान शहा रेझा पहलवींना सत्तेवरून काढून टाकण्यात आलं होतं. इराणला धर्मवादी, इस्लामिक रिपब्लिक बनवल्यानंतर ते न्याय पालिकेत कार्यरत झाले. 1981मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या अयातुल्ला खामेनींकडून वयाच्या 25व्या वर्षी रईसी इराणचे डेप्युटी प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे वकील झाले. त्यानंतर ते न्यायाधीश झाले आणि ‘डेथ कमिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्त समितीमध्ये 1988 साली त्यांचा समावेश झाला. राजकीय कारवायांसाठी आधीपासूनच तुरुंगात असलेल्या हजारो कैद्यांवर या कोर्टाच्या मार्फत पुन्हा खटला चालवून जवळपास पाच हजार राजकीय कैदी स्त्राr पुरुष ज्यामध्ये बहुतांश इराणमधील डाव्या विचारसरणीच्या सदस्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे. आपल्या अशा निकालांना त्यांनी अयातुल्ला खामेनींच्या विचारांशी सुसंगत ठरवले. त्यांचे उत्तराधिकारी ठरवलेल्या दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक नेते अयातुल्ला हुसैन अली मोतांजेरी यांची करण्यात आलेली नेमणूक रद्द करण्यात हातभार लावला आणि आताचे प्रमुख दुसऱ्या खोमेनी यांना सर्वोच्च बनवण्यात हातभार लावला. त्याचे इनाम म्हणून त्यांची 2014 मध्ये इराणच्या सर्वात महत्त्वाच्या आणि समृद्ध धार्मिक संस्थेच्या संरक्षकपदी नेमले. ते आधी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. मात्र यशस्वी झाले नाहीत. 2019 मध्ये त्यांना अयातोल्ला अली खामेनी यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदी नेमलं. यानंतर काही आठवड्यातच रईसी यांनी पुढचा सर्वोच्च धार्मिक नेता निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या 88 मौलवींच्या समितीचं उपाध्यक्ष बनवलं गेलं. 2021 च्या निवडणुकीत रईसी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरताना इराणला गरिबी, भ्रष्टाचार, भेदभाव आणि अपमानाच्या वागणुकीतून मुक्त करणारा स्वतंत्र उमेदवार अशी आपली प्रतिमा बनवली आणि यशस्वी झाले. पण, इतके असूनही जनतेच्या मनात काही ते स्थान मिळवू शकले नाहीत. राष्ट्रप्रमुख खोमेनी यांचे ते उत्तराधिकारी ठरले. पण, अपघाती मृत्यूने त्यांना गाठले. त्यांच्या मृत्यूमुळे इराणवर कोणताही परिणाम होणार नाही हे खोमेनी यांचे वक्तव्य हे त्यांचे संचित! इराणनं 13 एप्रिलच्या रात्री इस्रायलवर 300 हून जास्त क्षेपणास्त्रांचा मारा आणि ड्रोन हल्ले सुरू केल्यानंतर भविष्यात या राष्ट्रांमध्ये युद्ध छेडले गेले आणि त्यांच्या समर्थनार्थ इतर राष्ट्रे उतरत गेली तर गंभीर स्थिती निर्माण होईल अशी जगाला चिंता आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात 2100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. त्यामुळे दोघांमधील हल्ला करण्याचे मुख्य माध्यम हे क्षेपणास्त्रच असणार हे स्पष्ट आहे. इस्त्रायल इराणबरोबर थेट युद्ध पुकारण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी इस्रायलची सर्वात मोठी शक्ती म्हणजे हवाई हल्ल्याची क्षमता आणि त्यांचे गाईडेड वेपन्स हे आहेत. त्यामुळं इराणमधील महत्त्वाच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे इस्रायलकडून प्रामुख्यानं हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची आणि तेलाचे साठे नष्ट करण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूकडे पहावे का हा खरा प्रश्न आहे. रमजानच्या महिन्यात धुमसत असलेला वाद आणि इशारा देऊन इराणनं 13 एप्रिलच्या रात्री इस्रायलवर 300 हून जास्त क्षेपणास्त्रांचा मारा आणि ड्रोन हल्ले सुरू केले. त्यामुळे भविष्यात या राष्ट्रांमध्ये युद्ध छेडले गेले तर काय? आणि त्यांच्या समर्थनार्थ इतर राष्ट्रे उतरत गेली तर गंभीर स्थिती निर्माण होईल अशी जगाला चिंता आहे. त्यामुळेच ही दुर्घटनाच ठरावी, असा जग विचार करत असेल.  इस्रायल आणि इराण यांच्यात 2100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. त्यामुळं दोघांमधील हल्ला करण्याचं मुख्य माध्यम हे क्षेपणास्त्रच असणार हे स्पष्ट आहे. इस्त्रायल, इराणबरोबर थेट युद्ध पुकारण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी इस्रायलची सर्वात मोठी शक्ती म्हणजे हवाई हल्ल्याची क्षमता आणि त्यांचे गाईडेड वेपन्स हे आहेत. इराणमधील महत्त्वाच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे इस्रायलकडून प्रामुख्यानं हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची आणि तेलाचे साठे नष्ट करण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघाती मृत्यूकडे पहावे का हा खरा प्रश्न आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.