For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अळणावर येथील श्री लक्ष्मीदेवी,श्री दुर्गादेवी मिरवणुकीला मोठा प्रतिसाद

10:23 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
अळणावर येथील श्री लक्ष्मीदेवी श्री दुर्गादेवी मिरवणुकीला मोठा प्रतिसाद
Advertisement

आज महारथोत्सव-सायंकाळी गदेगवर स्थानापन्न

Advertisement

वार्ताहर /नंदगड

अळणावर येथील श्री लक्ष्मीदेवी व श्री दुर्गादेवी यात्रोत्सव 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दि. 18 पासून मोठ्या उत्साहाने सुरू आहे. दि. 18 रोजी विवाह सोहळा, दि. 19 रोजी ओट्या भरण्याचा कार्यक्रम, दि. 20 पासून तीन दिवस शहरातील प्रमुख मार्गावरून देवींची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी रोज मोठ्याप्रमाणात भाविक उपस्थित होते. श्री लक्ष्मीदेवी व श्री दुर्गादेवीच्या लाकडी मूर्तीना हातात घेऊन खेळवण्यात येत होते. देवींची गल्लोगल्ली मिरवणूक काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात युवक नृत्य करत होते. लक्ष्मीदेवी व दुर्गादेवीचा गजर करण्यात येत होता. देवीच्या मिरवणुकी दरम्यान भंडारा मोठ्याप्रमाणात उधळण्यात आला. आज महारथोत्सव अळणावर येथील लक्ष्मीदेवी व दुर्गादेवी यात्रेनिमित्त पाच खाणी रथ बांधण्यात आला आहे. या रथामध्ये दोन्ही मुर्त्या ठेवून प्रथेप्रमाणे शहरातील नियोजित मार्गावरून मंगळवार दि. 23 रोजी दुपारी 1 वा. रथ ओढण्यात येणार आहे. तर सायंकाळी देवींची गदगेवर स्थापना केली जाणार आहे. रथोत्सव पाहण्यासाठी हल्याळ, बिडी, धारवाड, खानापूर, बेळगाव, रामनगर, दांडेली परिसरातील भाविक दाखल होणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.