For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

तिन्ही संरक्षण दलांची मोठी तयारी

06:45 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिन्ही संरक्षण दलांची मोठी तयारी

देशाचे पहिले ट्राय-सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन मुंबईत शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुंबईला देशाचा सर्वात शक्तिशाली सैन्यतळाचे स्वरुप देण्याचे नियोजन सुरू आहे. पहिल्यांदाच देशाच्या आर्थिक राजधानी ट्राय-सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन तयार करण्याची योजना आखली जत आहे. म्हणजेच भूदल, वायुदल आणि नौदलाचा संयुक्त तळ मुंबईत असणार आहे. हे स्टेशन इंटीग्रेटेड थिएटर कमांडपूर्वीच तयार होण्याची शक्यता आहे. संरक्षण दलांच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करण्यासाठी अनेक निर्णय हाती घेण्यात आले आहेत.

Advertisement

मुंबईत तिन्ही दलांचे एक संयुक्त स्टेशन तयार केले जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. आतापर्यंत देशात एकही कॉमन डिफेन्स स्टेशन नाही. केवळ अंदमान आणि निकोबारमध्ये तिन्ही दलांचे कमांड आहे, जे 2001 मध्ये स्थापन करण्यात आले होते.

Advertisement

मुंबईत  ट्राय-सर्व्हिस डिफेन्स स्टेशन तिन्ही दलांदरम्यान आणखी उत्तम समन्वय स्थापन करण्याच्या उद्देशाने निर्माण केला जाणार आहे. येथे तिन्ही दलांसाठी लॉजिस्टिक सपोर्ट असणार आहे. तसेच मूलभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. दुरुस्ती अन् देखभालीची सुविधा देखील असणार आहे.

नौदल करणार नेतृत्व

मुंबईत तिन्ही दलांच्या डिफेन्स स्टेशनचे नेतृत्व नौदल करणार आहे, कारण नौदलाची उपस्थिती तेथे सर्वाधिक आहे. सध्या तिन्ही दलांचे केंद्र मुंबईच्या विविध भागांमध्ये आहेत. सर्व केंद्रांकडून वेगवेगळ्या स्वरुपात काम केले जाते. तर नव्या योजनेनुसार लॉजिस्टिक, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिनिस्ट्रेशनला एकत्रित केले जाणार आहे.

सध्या आयएनएस करंज नौसैनिक प्रशिक्षण करविते, येथेच अनेक महत्त्वपूर्ण आयुध डेपो आहेत. भूदलाचा ऑर्डेनेंस डेपो, प्रशिक्षण क्षेत्र वेगळे आहे. वायुदलाचे सर्व कामकाज वेगळे आहे, परंतु मुंबईत या सर्वांना एकत्र आणले जाणार आहे.

ट्राय-सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशनमुळे देशाचा पश्चिम किनारा आणि भागात तिन्ही दल एकत्रितपणे कुठलीही मोहीम साकार करू शकणार आहे. तसेच पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर ठेवता येणार आहे. याचबरोबर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी येथे शाळा, रुग्णालय, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि ट्रेनिंग फॅसिलिटी असणर आहे.

आणखी दोन कॉमन डिफेन्स स्टेशन्स

आयएनएचएस अश्विनी नौदलाचे रुग्णालय असून आता याचा वापर भूदल आणि वायुदल देखील करू शकणार आहे. तिन्ही दलांसाठी जारी होणारा निधी एकाच चॅनेलद्वारे येणार आहे. याचबरोबर मुंबईनंतर कोइम्बतूरनजीक सुलूर तसेच गुवाहाटीत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे कॉमन डिफेन्स स्टेशन  स्थापन केले जाणार आहे. सुलूरमधील स्टेशनची धुरा वायुदलाकडे असणार आहे. तर गुवाहाटीत याचे नियंत्रण भूदलाकडे असणार आहे.

Advertisement
Tags :
×

.