For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पत्रकारितेतही उत्तम करियरची संधी - नीलेश जोशी

03:20 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पत्रकारितेतही उत्तम करियरची संधी   नीलेश जोशी

कुडाळ SRM कॉलेजात 'पत्रकारितेच्या क्षेत्रातील संधी' या विषयावर मार्गदर्शन

Advertisement

कुडाळ -आजच्या काळात फक्त बातमीदारीच्या पलीकडे देखील वेगवेगळ्या दहा ते बारा प्रकारच्या रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे सुद्धा एक चांगले करियर म्हणून पाहायला हरकत नाही, असे प्रतिपादन कुडाळ येथील पत्रकार नीलेश जोशी यांनी केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त'पत्रकारितेच्या क्षेत्रातील संधी' या विषयावर पत्रकार नीलेश जोशी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.श्री जोशी यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध प्रकारच्या संधींचा परिचय करून दिला. मुद्रित माध्यमापासून ते इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियापर्यंत होत गेलेल्या बदलांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन करणे महत्त्वाचे आहे. तुमच्यापाशी उत्तम माहिती असायला हवी. त्याबरोबरच निरीक्षण, सजगता, सतर्कता आणि बहुश्रुतता आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. जवळपास पंचवीस वर्षाच्या या क्षेत्रातील आपल्या अनुभवांच्या आधारे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. बातमी लिहिल्यापासून ती वृत्तपत्रातून वाचकांच्या हाती पोहोचेपर्यंत तिच्यावर होणाऱ्या विविध टप्प्यातल्या संस्काराविषयी त्यांनी अतिशय बारकाव्यांसहित माहिती दिली.त्याचबरोबर पत्रकारितेतील आपले अनुभव सुद्धा सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. लोखंडे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील असलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करीत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लोखंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देऊन नीलेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. शरयू आसोलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कॅप्टन डॉ. आवटी यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रा. संतोष वालावलकर यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.