भाड्याने मिळतात थडगी
भाडे न भरल्यास बाहेर काढले जातात अवशेष
जिवंतपणी भाड्याने घर घेऊन राहणे माणसांची हतबलता असते, तर पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, जेथे मृत्यूनंतरही लोकांना भाड्याने जागा घ्यावी लागते. एका अशाच दफनभूमी लोकांना भाडेतत्वावर थडगे मिळते, ज्यात तो स्वत:च्या परिजनांना दफन करू शकतात, ही दफनभूमी बोलिविया येथे आहे.
बोलिवियाच्या ला पाजची सर्वात मोठी दफनभूमी सीमेंटारियो जनरल आहे. येथे लोकांना स्वकीयांच्या अंत्यसंस्कारासाठी भाडेतत्वावर थडगं देण्यात येते. या दफनभूमी दरवर्षी 50 हजार मृतदेहांची देखभाल केली जाते.
येथेही मृतदेहांना प्रथम पाश्चिमात्य प्रथेद्वारे दफन कले जाते किंवा एखाद्या तळघरात ठेवले जाते. मग 10 वर्षांच्या आत त्यांना थडग्यामधून बाहेर काढत अग्निसंस्कार केले जातात, त्यानंतर परिवार अस्थी ठेवण्यासाठी दफनभूमीच्या भिंतींमध्ये निर्मित छोट्या छोट्या काचेच्या प्लेटने बंद तिजोरीसारख्या जागेला भाडेतत्वावर घेऊ शकतो. यात मृताचे स्मृतिचिन्ह, अस्थी आणि फुले अर्पण केली जातात.
प्रत्येक भिंतीवर असे शेकडो छोटे छोटे दरवाजे असतात, काही भिंतींना वरच्या दिशेने इतके वाढविण्यात आले आहे की ते तीन ते चारमजली अपार्टमेंट ब्लॉकसारख्या दिसतात. ही दफनभूमी वर्दळ असलेले स्थान असते, जेथे लोक स्वत:च्या मृत स्वकीयांच्या अवशेषांवर फुल अर्पण करण्यासाठी येत असतात.
ही दफनभूमी 210 एकर क्षेत्रात फैलावली असून यात जवळपास 20 लाख लोकांचे अवशेष दफन आहेत. येथे लोकांना केवळ 5 वर्षांसाठी पार्थिव दफन करण्यासाठी जागा मिळते. यानंतर 5 वर्षे पूर्ण झाल्यावर भाडे देण्याची वेळ येते आणि एक नोटीस लावली जाते, ज्यात भाडे न भरल्यास थडगं रिकामी करावे लागेल असे लोकांना कळविण्यात येते. निश्चित मुदतीत थडगं रिकामी न केल्यास मृतदेह बाहेर काढण्यात येतो. याचमुळे लोक स्वकीयांच्या अवशेषांना सुरक्षित ठेवण्यासाठी मग एका छोटीशी जागा दफनभूमीच्या भिंतीवर भाडेतत्वावर घेतात आणि त्यात स्वकीयाच्या स्मृतींना साठवतात आणि दरवर्षी श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.