थडगी साफ करण्याचा साईड बिझनेस
अधिक कमाईतून खरेदी केले आलिशान घर
जगात लोक अनेक प्रकारचे व्यवसाय करत असतात. यातील काही लोकांना नव्या बिझनेस आयडियेद्वारे मिळविलेले यश जगभरात नावाजले गेले आहे. असेच काहीसे इंग्लंडच्या 31 वर्षीय शॉन टूकीने सुरू केले आहे. शॉनने साइड बिझनेस म्हणून थडग्यांची सफाई करत एक यशस्वी व्यवसाय उभा केला, तसेच स्वत:चे परिश्रम आणि चिकाटीपणातून डिसेंबर महिन्यात परिवारासाठी आलिशान घरही खरेदी केले आहे.
मे 2023 मध्ये शॉनने थडग्यांच्या सफाईचा व्यवसाय सुरू केला, या कामासाठी तो परिवारांकडून 187 ते 312 डॉलर्स म्हणजेच 16-26 हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारतो. तर अक्षरं पुन्हा रंगविणे आणि सजावटीसाठी 437 ते 562 डॉलर्स म्हणजेच 37-48 हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारतो. शॉन दरदिनी 2-4 थडग्यांची सफाई करतो. तर प्रत्यक्षात पूर्णवेळ ट्री-सर्जनची नोकरी देखील करतो.
साइड बिझनेसमधून चांगली कमाई
शॉन हर्लो, एसेक्स येथे राहतो, लोकांना मी जी सेवा देतो, ती ते स्वत: करण्यास असमर्थ असतात. हे काम अत्यंत समाधानकारक आहे. स्वकीयांच्या थडग्यांची सफाई करण्याची पद्धत माहित नसलेल्या लोकांना मदत करणे माझ्यासाठी अत्यंत खास आहे. हे काम अद्याप बहुतांश लोकांसाठी नवे असल्याचे शॉन सांगतो.
वर्षभरात मोठी कमाई
या व्यवसायामुळे माझ्या परिवाराला स्थिरता लाभली आहे. आम्हाला पैसे वाचविणे आणि भाड्याच्या घरात राहण्याऐवजी स्वत:चे आकर्षक घर खरेदी करण्याची संधी यामुळे मिळाली. एका वर्षात मी आतापर्यंत 300 हून अधिक थडग्यांची सफाई केली आहे. यातून झालेल्या कमाईतून मी स्वत:चे घर खरेदी केले असल्याचे शॉनने सांगितले आहे. शॉन स्वत:च्या कामाची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतो.
सोशल मीडियाद्वारे मिळतात कामं
त्याचे बहुतांश ग्राहक सोशल मीडिया किंवा काम करविणाऱ्या लोकांच्या शिफारसीतून प्राप्त झालेले आहेत. मी सोशल मीडियावर सक्रीयअसून माझे व्हिडिओ आता पूर्वीपेक्षा अधिक चांगले ठरत आहेत. याचबरोबर मी कार्ड देखील वाटत असतो. जेव्हा मी दफनभूमीत काम करत असतो, तेव्हा लोक ही सेवा युकेतही उपलब्ध आहे का अशी विचारणा करतात असे शॉनने म्हटले आहे.
किती वेळ लागतो?
कामाची वेळ थडग्यांचा आकार आणि सजावटीवर अवलंबून असते. जर परिवाराला गोल्ड लीफ अक्षरं हवी असल्यास ती मी करू शकतो. जर त्यांना केवळ रंग काढून घ्यायचा असेल तर ते देखील मी करू शकतो. माझ्याकडे मानक दर असून मी अतिरिक्त सेवाही जोडतो. छोट्या थडग्यांना साफ करण्यास 30 मिनिटे ते 1 तासांपर्यंतचा वेळ लागतो. तर मोठ्या थडग्यांच्या सफाईकरता काही तास लागत असतो असे त्याचे सांगणे आहे.