कंग्राळी शिवारात गवतगंजीला आग
50 हजाराचे नुकसान : नुकसानभरपाई देण्याची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
येथील तलावाच्या बाजूला असलेल्या शिवरामधील मळणी करून ठेवलेल्या दोन गवतगंजींना अज्ञातांकडून आग लावली. त्यामुळे जवळजवळ 50 हजारांचे नुकसान झाले. मंगळारी संध्याकाळी सदर आगीची घटना घडल्यामुळे इतर शेतकरी वर्गातून भीतीचे वातारण पसरले आहे. आपाजी कल्लाप्पा हर्जे व यल्लाप्पा हर्जे या दोन्ही भावंडांचे दीड ट्रॅक्टर ट्रॉली पिंजर जळून खाक झाले आहे. सायंकाळी सहा वाजता कुणी अज्ञातांकडून दोन्ही गवत गंजींना आग लावल्याचे सांगण्यात आले. यानंतर ते शेतामध्ये जाऊन पाहतात तर दोन्ही गंजी जळून खाक झाल्याचे दिसून आले. दोन्ही गंजी जळाल्यामुळे जनावरांसाठी परत पिंजर विकत घेणे गरजेचे आहे. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. अशा समाजकंटक अज्ञातांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य व तलाठी यांनी गंजीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.