महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ग्रासीम’ची रंग उत्पादनात उडी

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

आदित्य बिर्ला समूहांतर्गत कार्यरत असणारी ग्रासिम इंडस्ट्रीज गुरुवारी रंग उत्पादनात उतरली आहे. कंपनी बिर्ला ओपस नावाने आपला रंग भारतीय बाजारामध्ये उपलब्ध करणार आहे. रंग उत्पादनात असणाऱ्या एशियन पेंटस्, बर्जर पेंटस्, कंसाई निरोलॅक आणि इंडिगो पेंटस् यांच्यासोबत ग्रासीम स्पर्धा करण्यासाठी सज्ज असणार आहे. सजावटीच्या रंगाचा व्यवसाय ग्रासिम उद्योगाकडून गुरुवारी सुरू करण्यात आला आहे. कंपनीचे चेअरमन कुमारमंगलम् बिर्ला यांनी या संदर्भात बोलताना, पुढील तीन वर्षाच्या कालावधीत रंग उत्पादनाच्या व्यवसायातून दहा हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

Advertisement

याठिकाणी कारखाने

कंपनीने हरियाणातील पानीपत, पंजाबमधील लुधियाना आणि तामिळनाडूमधील चेय्यर या ठिकाणी बिर्ला ओपस् रंग उत्पादनाचे कारखाने सुरू केले आहेत. या तीन राज्यांतील ग्राहकांना कंपनीचा रंग मार्च 2024 मध्ये उपलब्ध होईल. जुलै 2024 नंतर रंग 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये उपलब्ध होईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article