द्राक्ष उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई
हातनूर :
तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी 2023 मध्ये पुनर्राचित हवामानावर आधारीत द्राक्ष पिकासाठी विमा भरला होता. संबांधित विमा कंपनीने शेतकऱ्यांना नाममात्र भरपाई देत 100 टक्के नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. याविरोधात माजी जि. प. सदस्य अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतक्रयांनी जिल्हाधिकारी व विभागीय संचालक पुणे यांच्याकडे दाद मागितली होती. यानुसार सांगली येथे जिल्हास्तरीय तक्रार निवारण सा†मतीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विमा कंपनीला पुढील आठ दिवसात शेतक्रयांच्या खात्यावर भरपाई जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 2023 मध्ये हवामानावर आधारित फळ विमा योजने अंतर्गत तासगाव तालुक्यातील विसापूर, मांजर्डे, मणेराजुरी, तासगाव व खानापूर तालुक्यातील खानापूर सर्कलमधील द्राक्ष उत्पादकांनी विमा भरला होता. अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले होते. द्राक्ष उत्पादकांना 3220 रू. प्रती गुंठा भरपाई विमा कंपनीकडून मिळणे आवश्यक होते. परंतु यामध्ये फसवणूक होऊन 1056 रू. प्रती गुंठाप्रमाणे अल्प विमा रक्कम जमा केली होती. याची चौकशी करून पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी केली होती. याबाबत माजी जि. प सदस्य अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली द्राक्ष उत्पादक शेतक्रयांनी जिल्हाधिकारी व विभागीय संचालक पुणे यांच्याकडे लेखी दाद मागितली होती.
बुधवार 18 रोजी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण बैठक संपˆ झाली. यात द्राक्ष उत्पादकांना आठ दिवसात 100 टक्के भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. भरपाई मिळाली नाही तर संबांधित कंपनी विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. तसा अहवाल कृषी आयुक्त व एच. डी.एफ. सी. अॅग्रो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती अर्जुन पाटील यांनी दिली. यामुळे द्राक्ष उत्पादकांना आर्थिक मदत होणार आहे.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार. जिल्हा समन्वयक एचडीएफसी एर्गो (फळपीक विमा कंपनी) तंत्र अधिकारी (सांख्यिकी) शरद काळेल, विजयसिंह घोरपडे, जिल्हा व्यवस्थापक बजाज अलायांझ जनरल इन्शुरन्स अमर मोकाशी, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज डॉ. एस. बी. महाजन, जिल्हा अग्रणी बँक सांगली विश्वास वेताळ, नाबार्ड सांगलीचे सहायक महाप्रबंधक निलेश चौधरी, स्कायमेटचे सुधीर पाटील,प्रीतम कांबळे जिल्हा समन्वयक सांगली भारतीय कृषि कंपनी, शेतकरी प्रतिनिधी प्रमोद पाटील, मिरज, महादेव हिंगामिरे, जत, संग्राम पाटील तासगांव अर्जुन पाटील विसापूर उपस्थित होते.
शेतक्रयांच्या लढ्याला यश द्राक्ष पिकाचा विमा हप्ता भरून अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा कंपनीने नाममात्र भरपाई देत शेतक्रयांच्या तोंडाला पाने पुसली होती. 100 टक्के नुकसान भरपाई देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. शेतक्रयांनी अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत याविरोधात लढा उभारला. सांगली व पुणे येथे प्रशासनाकडे दाद मागितली. आमरण उपोषणाचा इशारा दिला. याची दखल घेत भरपाई जमा करण्याचे आदेश देण्यात आले. अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एक लढ्याला यश मिळाले. नुकसान भरपाई मिळण्याबाबत आदेश देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना किमान 5 ते 7 कोटी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या सर्कलमध्ये पर्जन्य नोंदीबाबत तफावत विसापूर, मांजर्डे, मणेराजुरी, तासगाव व खानापूर तालुक्यातील खानापूर सर्कलमधील पर्जन्यमापकाच्या नोंदीमध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे स्कायमेटच्या नोंदीप्रमाणे पर्जन्य नोंदी ग्राह्य धरून शेतक्रयांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. इतर सोयाबीन ज्वारी भुईमूग सह खरीप पिकाविम्याचे पैसे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतक्रयांच्या खात्यावर जमा होतील, अशी माहिती जिल्हा कृषीअधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.