For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रॅन्ट हॉलोवे ऑलिंपिक सुवर्णासाठी उत्सुक

06:27 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रॅन्ट हॉलोवे ऑलिंपिक सुवर्णासाठी उत्सुक
Advertisement

वृत्तसंस्था/युगेनी

Advertisement

अमेरिकेचा अॅथलिट ग्रॅन्ट हॉलोवेने येथे सुरू असलेल्या अमेरिकन ट्रॅक फिल्ड ऑलिंपिक चाचणी स्पर्धेत पुरूषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीत 12.86 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले. आता तो पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकासाठी आतुरलेला आहे.

26 वर्षीय ग्रॅन्ट हॉलोवेने पुरूषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीच्या क्रीडा प्रकारात तीनवेळा विश्वविजेतेपद मिळविले आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत त्याला या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली होती. अमेरिकेकडून आता तो पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकासाठीचा फेव्हरिट अॅथलिट म्हणून ओळखला जातो.

Advertisement

Advertisement
Tags :

.