For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणबर्गी औद्योगिक रस्त्यांसाठी अनुदान मंजूर

03:24 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
कणबर्गी औद्योगिक रस्त्यांसाठी अनुदान मंजूर
Advertisement

खासदार शेट्टर यांच्या प्रयत्नांना यश

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरानजीकच्या कणबर्गी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते अनेक वर्षांपासून खराब झाले आहेत. याबद्दल ऑक्टोबर 2025 मध्ये खासदार जगदीश शेट्टर यांनी कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांना पत्र लिहिले होते. यापैकी दोन कामांना मंजुरी देऊन 7.37 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कणबर्गी औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक लहान-मोठे उद्योग आहेत. परंतु रस्त्याअभावी दळणवळणाच्या समस्या निर्माण होत होत्या. यामुळे हे रस्ते तातडीने करावेत, अशी मागणी उद्योजकांनी केली होती. तीन रस्त्यांच्या कामासाठी 9.10 कोटी अनुदानाची मागणी शेट्टर यांनी केली होती. त्यापैकी दोन रस्त्यांना मंजुरी देऊन 7.37 कोटी रुपयाचा निधी दिला जाणार आहे.

Advertisement

औद्योगिक क्षेत्रातील पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा व दहावा मुख्य रस्ता तसेच पहिला, दुसरा, तिसरा, सातवा व नववा क्रॉस सुधारणा करण्यासाठी 5.62 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच नाल्याचे बांधकामही केले जाणार आहे. तर चौथा क्रॉस येथील रस्त्यासाठी तसेच नवीन नाल्याच्या बांधकामासाठी 1.75 कोटी मंजूर केल्याची माहिती दिली. तसेच उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांचे आभारही मानण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.