युवांना टक्कर देते आजी
वय केवळ एक आकडा आहे ही बाब 86 वर्षीय मार्गारेट चुलाने पूर्ण जगाला सिद्ध करुन दाखविली आहे. जाम्बिया या देशातील या आजीची स्टायलिश छायाचित्रे सोशल मीडियावर गाजत आहेत. लोक त्यांना ‘लेजेंडरी ग्लामा’ नावाने ओळखतात. या आजी इतक्या ट्रेंडी आणि कॉन्डिफेंट पद्धतीने कपडे परिधान करतात की युवाही चकित होतात.
मार्गारेट यांची नात डायना काउम्बामुळे हे सर्व काही सुरू झाले. डायना एक फॅशन स्टायलिस्ट आहे. एकेदिवशी तिने स्वत:च्या आजीसोबत मजेशीर आउटफिट स्वॅप केला. त्याचे व्हिडिओ आणि फोटोजना तिने ‘ग्रॅनी सीरिज’ नाव दिले. गावातील साधारण मातीच्या भिंती आणि शेतांदरम्यान हाय फॅशन कपडे परिधान केलेल्या मार्गारेट यांची छायाचित्रे पाहून लोक थक्क झाले. सिक्विनयुक्त ड्रेस, बोल्ड सनग्लासेस, रंगबिरंगी विग्ज आणि आधुनिक दागिन्यांसोबत तिची छायाचित्रे व्हायरल झाली.
जगभरात चर्चा
ही छायाचित्रे व्हायरल होताच आंतरराष्ट्रीय मीडिया आणि फॅशन प्लॅटफॉर्म्सचे लक्ष त्यांच्यावर गेले. मार्गारेट आता केवळ एक आजी नव्हे तर एजलेस फॅशन आयकॉन ठरल्या आहेत. अनेक मोठ्या फॅशन मॅगजीन्स आणि ब्रँड्सनी त्यांची छायाचित्रे फिचर केली आहेत. लोक त्यांचा आत्मविश्वास आणि स्टाइलचे कौतुक करत आहेत. फॅशन कुठलेच वय पाहत नाही. मी माझ्या नातीसोबत मिळून नवव्या स्टाइल ट्राय करत असते असे मार्गारेट सांगतात. त्यांच्या छायाचित्रांमध्ये आफ्रिकन संस्कृती आणि आधुनिक फॅशनचा सुंदर मिलाप दिसून येतो. ग्रामीण पार्श्वभूमी आणि लक्झरी लुकचा हा कंट्रास्टच त्यांच्या छायाचित्रांना खास ठरवितो.
लोकांच्या प्रतिक्रिया
अनेक युवा आता मार्गारेट यांना स्वत:चा रोल मॉडेल मानू लागले अहेत. जर आजी इतकी स्टायलिश असू शकते, तर आम्ही का नाही असे ते सांगत अताहेत. मार्गारेट चुलाचे उदाहरण फॅशन वयाच्या मर्यादेत बांधलेले नाही हे सिद्ध करते. 80 पार देखील कुठलाही व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण आणि स्टायलिश राहू शकतो. त्यांच्या यशाने अनेक वृद्धांनाही प्रेरित केले आहे. आता अनेक अन्य आजी आजोबाही सोशल मीडियावर स्वत:ची स्टाइल दाखवू लागले आहेत.