निरागस नातीला पाहुन तो सैतान झाला...विकृत बापाला कठोर शिक्षा देण्याची मुलीची मागणी
Paravti Sexual Assault incident : नसरापूर येथे लहान मुलीवर झालेल्या भीषण अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या घटनेनंतर आता पर्वती येथे विकृत प्रकार समोर आला आहे. आपल्याच नातीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाचा क्रूर चेहरा समोर आला होता. या प्रकरणात आता एक नवी माहिती समोर आली आहे. पिडीत मुलीच्या आईनेच आता माझ्या वडिलांना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी केलीय. आपल्या वडिलांनीच आपल्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्याचे कळताच पिडीत मुलीच्या आईने संतापून अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पर्वती येथील एका 70 वर्षांच्या वृद्धाने आपल्या स्वत:च्या नातीवरच अत्याचाराचा (Rape) प्रयत्न केल्याचे उघड झाले. पिडीत चिमुरडीचे आई-वडील हे रोज कामासाठी घराबाहेर असतात. नेमक्या याच वेळी या वृ्द्धाने घरातच नातीवर अतिप्रसंग (Sexual Assault) करण्याचा विकृत प्रयत्न केला. घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना पिडीत मुलीच्या आई वडिलांनी प्रचंड संताप व्यक्त केला. माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या, अशी संतप्त पिडीत बालिकेच्या आईने केली. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Pune Crime news)
या चीड आणणाऱ्या घटनेबद्दल बोलताना मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले की, आम्ही दोघे दिवसभर कामावर जातो. मी कपड्याच्या दुकानात कामाला जाते. माझे पती रिक्षा चालवतात. जेव्हा माझं काम संपवून मी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास घरी आले तेव्हा माझ्या मुलीने मला हा सगळा प्रकार सांगितला. मी पाहिलं की तिच्या अंगावर कपडे नव्हते. तसेच अंगावर नखांचे ओरखडे होते. माझ्या स्वत:च्याच बापाने माझ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला फाशी झाली पाहिजे"
या प्रकरणात पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. असेही पिडीत मुलीच्या आईने सांगितले. पुढे बोलताना पिडीत बालिकेची आई म्हणाली आमच्या मुलीने आम्हाला सांगितले की, यापूर्वीही असाचा प्रकार घडला होता. पण तेव्हा ती गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. मुलीने सांगितले की, आधीही आजोबांनी माझ्यासोबत असे घाणेरडे कृत्य केले होते. पिडीतेच्या आईने सांगितल्याप्रमाणे तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घेत होते. तेव्हा मी बाहेर पळून गेल्याचे मुलीने मला सांगितले. आता दुसऱ्यावेळी ही मोठी घटना घडली. . पोलिसांनी आम्हाला सांगितले की, 'आम्ही तुमच्यासोबत आहोत. लय कालवा करु नका, लोकांना काही सांगू नका. कोणी मोर्चा वगैरे काढला तर दगडफेक होईल', असं पिडीत बालिकेच्या आईने माध्यमांना सांगितले.
पिडीत बालिकेचे वडिल प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाले, मी रिक्षा चालवतो. काल मी नेहमीप्रमाणे घरी नव्हतो. आमचा मुलगा घरात झोपला होता. हे सगळं संध्याकाळी सात वाजता घडलं. माझी पत्नी नऊ वाजता कामावरुन घरी आली आणि हा सगळा प्रकार समोर आला. वर्षभरापूर्वी सासऱ्यांनी माझा मोबाईल चोरला, तेव्हाच मी त्यांना घराबाहेर काढले होते. मी बायकोला, तुला बाप हवा की नवरा असं विचारलं , तेव्हा तिने माझी निवड केली. यानंतरही माझ्या सासऱ्याने कुठंतरी घर घेतलं पण ते कुठं घेतलं हेच आम्हाला माहित नव्हतं. काल त्यांनी मुलीला खाऊ दिला. लहान मुलांना काही कळत नाही. त्यानंतर त्यांनी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.