कंग्राळी बुद्रुकमध्ये जंगी कुस्ती मैदान
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक श्री कलमेश्वर कुस्ती संघटना, श्री लक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री लक्ष्मी यात्रेनिमित्त मंगळवार दि. 5 मे रोजी भव्य निकाली आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन कलमेश्वर कुस्ती आखाडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात 80 हून अधिक लढती हेणार असल्याचे कलमेश्वर कुस्ती आखाड्याचे संस्थापक शंकर पाटील यांनी सांगितले. सदर कुस्ती मैदानात देशातील विविध राज्यातून मानांकीत अव्वल दर्जाच्या मल्लांच्या लढती होणार आहेत. कंग्राळी बुद्रुक येथे 43 वर्षांनंतर कुस्त्याचे मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी महालक्ष्मी यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आयोजित करण्यात आले आहे.
कुस्ती भरविण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती जयराम पाटील, मल्लाप्पा तलवार, तानाजी पाटील, विश्वनाथ पाटील, दत्ता पाटील, परशराम निलजकर यांनी प्रत्येकी भरघोस अशी देणगी जाहीर केली आहे. त्यामुळे हे मैदान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व कुस्ती संघटना कामाला लागली आहे. या बैठकीला शंकर पाटील, नाथाजी पाटील, विजय पावशे, नारायण कागणकर, जयराम पाटील, तानाजी पाटील, देवाप्पा निलजकर, सुरेश हर्जे, निंगाप्पा बेळगावी, शंकर कोलते, यल्लाप्पा निलजकर, गोपाळ पाटील, यल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.