For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुचंडी येथे 18 मे रोजी भव्य कुस्ती मैदान

11:10 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुचंडी येथे 18 मे रोजी भव्य कुस्ती मैदान
Advertisement

50 हून अधिक लढती होणार

Advertisement

बेळगाव : मुचंडी येथे श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवी यात्रेनिमित्त भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान सोमवार दि. 18 मे रोजी सिद्धेश्वर मंदिरच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व जागतिक पदक विजेता इरफान इराण यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत शिंदे व हरियाणा केसरी विरेंद्रकुमार, तिसरी लढत कर्नाटक कंठीरवा केसरी कामेश पाटील-कंग्राळी व महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध, चौथी लढत कर्नाटक केसरी सदाशिव नलवडे व महाराष्ट्र चॅम्पियन विश्वचरण सोलंनकर-कोल्हापूर, पाचव्या क्रमांकाची लढत कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव-कंग्राळी व कोल्हापुरचा अक्षय चौगुले, सहाव्या क्रमांकाची लढत कर्नाटक चॅम्पियन पार्थ पाटील-कंग्राळी व  तेजस गोफने, सातव्या क्रमांकाची लढत साताप्पा व सचिन शिरगुप्पी, आठवी लढत कार्तिक इंगळगी-दर्गा व बबलू नरळे-सातारा, नववी लढत विनायक येळ्ळूर व निखिल पाटील-कंग्राळी, दहाव्या क्रमांकाची लढत संभाजी काकती व पिल्ल्या-शाहूपुरी यांच्यात होणार आहे. या शिवाय 50 हून अधिक लढती होणार आहेत. मेंढ्याच्या लढतीसाठी बलराज चौगुले-सेनादल व विक्रम हुबळी, प्रल्हाद हुलीकोतली-सेनादल व तुषार शिंदे-सांगली, श्रेयस खाडली व विनायक गौंडवाड, स्वराज पाखरे-राशिवडे व तन्मय कंग्राळी यांच्यात होणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.