For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगांवात उद्या भव्य कुस्ती मैदान

10:05 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगांवात उद्या भव्य कुस्ती मैदान
Advertisement

विशाल भोंडू हरियाणा - महेंद्र गायकवाड पुणे यांच्यात प्रमुख लढत

Advertisement

वार्ताहर /उचगाव

उचगाव येथील हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या वतीने भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन रविवार दिनांक 31 मार्च रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आले असून या कुस्ती आखाड्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानसाठी भव्य असा आखाडा तयार करण्यात आला असून उर्वरित कामाची तयारी जोरदार सुरू आहे. या कुस्ती आखाड्यामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती विशाल भोंडू हरियाणा वि. महेंद्र गायकवाड पुणे यांच्यामध्ये होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती  हितेशकुमार पुणे व उमेश चव्हाण कोल्हापूर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी व  विक्रम शिनोळी यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार कार्वे विरुद्ध संजय इंगळगी यांच्यात, .याबरोबरच अशा एकूण 64 कुस्त्या होणार आहेत. हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी उचगाव मधील अनेक आजी माजी पैलवान तसेच युवक, ग्रामस्थ कामाला लागले असून, आखाड्याची पाहणी ,आखाड्याची दुरुस्ती आणि भव्य असा आखाडा तयार करण्यामध्ये सर्व कार्यकर्ते गुंतले आहेत. उचगाव गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या मरगाई देवीच्या परिसरातील भव्य अशा तलावामध्ये हा कुस्ती आखाडा आयोजित केला आहे .सदर तलाव प्रचंड मोठा असल्याने कुस्ती शौकिनांचा कुठेही बसून या कुस्तीचा आनंद त्यांना लुटता येतो. या कुस्ती मैदानाच्या उद्घाटन समारंभाला सर्व थरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या कुस्ती आखाड्याची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे. या कुस्ती आखाड्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार कुस्ती शौकीन कुस्त्या बसण्याची सोय करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.