For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूरात 2 मे रोजी भव्य कुस्ती मैदान

09:52 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूरात 2 मे रोजी भव्य कुस्ती मैदान
Advertisement

पुष्पेंदर अलमगीर पंजाब व  विनीतकुमार मारा हरियाणा यांच्यात प्रमुख लढत

Advertisement

बेळगाव : येळ्ळूर येथे श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीचा वाढदिवस अशा संयुक्त यात्रेनिमित्त भव्य लोकमान्य केसरीसाठी जंगी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन गुरुवार दि. 2 मे रोजी येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती हिंद केसरी, भारत केसरी इंडियन नेव्हीचा मल्ल पुष्पेंदर अलमगीर पंजाब व भारत केसरी विनीतकुमार मारा हरियाणा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी छत्रसाल आखाड्याचा पृथ्वीराज मोहोळ दिल्ली व भारत केसरी नरेंद्र आखाडा हरियाणाचा भोला बारण यांच्यात तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन भरत मदने पुणे व नरेंद्र आखाडा हरियाणाचा रोहित कटारिया यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती जितू आखाडा हरियाणाचा रोहिल चौधरी व महाराष्ट्र चॅम्पियन हंडे पाटील ता. सांगलीचा सुबोध पाटील यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी रोबिन हुड्डा रोहतक व डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात, सहाव्या क्रमांची कुस्ती डबल कर्नाटक केसरी संगमेश बिरादार व मोतीबागचा उदयराज पाटील टायसन यांच्यात, सातव्या क्रमांकाची कुस्ती दीपक दिल्ली व कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोणी, आठव्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी दर्गा व देवनरे दिल्ली, नवव्या क्रमांकाची करण दोहा दिल्ली व कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी, दहाव्या क्रमांकाची कुस्ती संजू इंगळगी दर्गा व कामेश कंग्राळी यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान मोठ्या 70 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्ती विजेता सौरभ पाटील राशिवडे व कर्नाटक किशोर रोहन घेवडी तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन रोहित पाटील व सांगलीचा उदयराज सासणे, कर्नाटक चॅम्पियन पार्थ पाटील व हनुमंत गंदीगवाड, चौथ्या क्रमांकाची कुस्ती विनायक पाटील येळ्ळूर व ओमकार पाटील सांगली, पाचव्या क्रमांकाची कुस्ती ओमकार खत्रे सांगली व समीर रणकुंडये, सहाव्या क्रमांकाची कुस्ती निखील माने सांगली व जोड पाहून, अशी माहिती येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भोला पाखरे व कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.