For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खादरवाडीत रविवारी भव्य कुस्ती मैदान

09:57 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
खादरवाडीत रविवारी भव्य कुस्ती मैदान
Advertisement

प्रशांत शिंदे व सुमीत कुमार हरियाणा यांच्यात प्रमुख लढत

Advertisement

बेळगाव : खादरवाडी येथे जय हनुमान तालीम कुस्तीगीर संघटना व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मैदान महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चरणराज हट्टीहोळी, युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या संयोगाने रविवार दि. 2 जून रोजी बन्नीभरमा मंदिर, मंडोळी रोड, खादरवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती भोसले व्यायाम शाळेचा प्रशांत शिंदे सांगली व कुमार भारत केसरी सुमीत कुमार हरियाणा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कामेश पाटील कंग्राळी व कर्नाटक कुमार प्रकाश इंगळगी, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती अमोल नरळे सांगली व किर्तीकुमार बेनके कार्वे, चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रेम पाटील कंग्राळी व सचिन नरे निपाणी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती यल्लाप्पा निर्वानहट्टी व मोहन निपाणी, सहाव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज कंग्राळी व विनायक येळ्ळूर, सातव्या क्रमांकाची कुस्ती बाळू शिंदीकुरबेट व बबलू नरळे सांगली, आठव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम तुर्केवाडी व निरंजन येळ्ळूर, नवव्या क्रमांकाची कुस्ती निशांत राशिवडे व भक्ष दर्गा, दहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रवीण निलजी व महादेव दऱ्यानंवर यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक कुस्ती प्रणव खादरवाडी व प्रथमेश येळ्ळूर तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती चेतन येळ्ळूर व निखील कोल्हापूर, गद्याच्या बक्षिसासाठी पिंटू नाईक तुर्केवाडी व करण खादरवाडी, ओमकार खादरवाडी व राहुल माचीगड यांच्यात होणार आहे. तर महिलांसाठी प्रभा खादरवाडी व श्रवणी आंबेवाडी यांच्या होणार असून मेंढ्याच्या बक्षिसासाठी कुस्ती प्रज्वल मच्छे व श्रवण कडोली यांच्यात होणार आहे. या मैदानात महिलांना कुस्तीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

1) कल्याणी वाघवडे व राधिका अनगोळ 2) शीतल खादरवाडी व जान्वी किणये 3) भक्ती गावडे व राणी उचगाव 4) प्रांजल बिर्जे अनगोळ व सुषमा खादरवाडी 5) श्रृती खादरवाडी व श्रावणी गवळी ठळकवाडी 6) सुकन्या संतिबस्तवाड व श्रेया शिवनगेकर 7) श्रेया पाटील खादरवाडी व सुस्मिता संतिबस्तवाड 8) आराध्या येळ्ळूर व समिक्षा खानापूर 9) ऋतुजा वडगाव व तनुजा खानापूर तर स्वरांनी खादरवाडी व राधिका खादरवाडी यांच्या कुस्त्या जोड पाहून होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.