पिरनवाडी येथे उद्या भव्य कुस्ती मैदान
वार्ताहर/किणये
पिरनवाडी येथील हजरत शहा सदरोदीन अन्सारी उर्फ जंगली. पिर उरूस निमित्त छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा कुस्ती संघटना यांच्या वतीने रविवार दिनांक 9 रोजी जनता प्लॉट पिरनवाडी येथे भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. याची सध्या जयत तयारी सुरू असून या आखाड्यात 45 नामवंत पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. आखाड्यातील पहिली कुस्ती कोल्हापूर येथील महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध हरियाणा येथील निशांत बामडोला यांच्यात होणार आहे. दुस्रया क्रमांकाची कुस्ती सांगली येथील महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत शिंदे विरुद्ध हरियाणा येथील पैलवान देवा चौधरी यांच्यात होणार आहे. तिस्रया क्रमांक ची कुस्ती मठपती आखाडा येथील कर्नाटक केसरी पैलवान संगमेश बिरादार विरुद्ध उत्तर प्रदेश येथील बंटी खान यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती गणेशपुर येथील निखिल पैलवान विरुद्ध मठपती आखाडा येथील शिवया पूजार यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूर येथील विनायक वासकर विरुद्ध पैलवान शिवा दड्डी यांच्यात होणार आहे.
सहाव्या क्रमांकाची कुस्ती सांगली येथील किरण पाटील विरुद्ध कंग्राळी येथील पैलवान प्रेम यांच्यात होणार आहे. सातव्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूर येथील प्रवीण पाटील व कंग्राळी येथील पैलवान पार्थ यांच्यात होईल. आठवा क्रमांक बसू जगदाळ विरुद्ध पृथ्वीराज पाटील कंगाळी, नववा क्रमांक ची कुस्ती कोल्हापूर येथील पैलवान विठ्ठल विरुद्ध खानापूर येथील पवन, दहाव्या क्रमांकाची कुस्ती सांगली येथील कुबेर सिंग विरुद्ध कंगराळी येथील प्रथमेश हट्टीकर यांच्यात होणार आहे. याचबरोबर या खड्यात अन्यही नामवंत पैलवानच्या कुस्त्या होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रवी मुचंडीकर, कृष्णा बिंदले, सचिन गोरले ,कुस्ती आश्रयदाते सतीश पाटील, मन्सूर नभीवाले आदींसह कमिटीचे सर्व सदस्य कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कार्यरत आहेत.कुस्ती आखाड्याच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.