कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोरेंचे जंगी स्वागत

12:36 PM Aug 11, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे नियुक्तीनंतर प्रथमच रविवारी येथे आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

Advertisement

शिवराज मोरे यांचे प्रथम तासवडे टोलनाक्यावर स्वागत केले. कराड शहरात आगमन झाल्यानंतर कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधींच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर प्रीतिसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. तसेच शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांनाही अभिवादन केले. शहरात कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन मोरे यांची रॅली काढली. माजी नगरसेवक अशोकराव पाटील, गजानन आवळकर, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, साहेबराव पवार, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, अमीर मेटकरी, ऋतुराज मोरे, अमित जाधव, दिग्वीजय पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवक काँग्रेसला फार मोठा वारसा आहे. शरद पवार, माणिकराव ठाकरे, उल्हास पवार, मोहन जोशी, विश्वजित कदम यांच्यासारख्या नेत्यांनी युवकचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले. प्रदेशाध्यक्षपदाची ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार. कराड शहराचा मानसन्मान वाढवण्यासाठी यापुढील काळात काम करणार. चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटना बळकट करणार, असे मोरे यांनी यावेळी सांगितले.

मत चोरीचा मुद्दा देशात गाजत आहे. कराड दक्षिण मतदारसंघात निवडणुकीपूर्वी चार महिने अहोरात्र काम करून हजारो मतदार शोधले. निवडणूक आयोगाकडे हरकती दाखल केल्या. त्यावर काहीही कारवाई झाली नाही. महाराष्ट्रातही व्होट चोरीचा प्रकार घडला. त्यावरच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. यापुढील काळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून व्होट चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करणार. अशी प्रतिक्रिया शिवराज मोरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article