For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राष्ट्रकुल’मधील पदक विजेत्यांचे जंगी स्वागत

06:22 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘राष्ट्रकुल’मधील पदक विजेत्यांचे जंगी स्वागत
Advertisement

पहिला गट मायदेशी दाखल, मीराबाई चानू-लवप्रीत सिंगसह अनेक वेटलिफ्टर्सचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : राष्ट्रकुल खेळांतील यशस्वी कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंचा पहिला गट मायदेशी परतला आहे. यामध्ये अव्वल दर्जाची वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि लवप्रीत सिंग यांचा समावेश होता. रविवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो चाहते उपस्थित होते.

Advertisement

ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाईने महिलांच्या 49 किलो वजन गटात सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले. ‘देशासाठी काही तरी चांगली कामगिरी केल्याचा मला खूप अभिमान वाटतो, असे मीराबाईने विमानतळावर बोलताना सांगितले. पुऊषांच्या 110 किलोहून अधिक वजन गटात अवघ्या एका किलोच्या फरकाने सुवर्णपदक हुकल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या लवप्रीतने सांगितले की, त्याचे पुढील लक्ष्य जपानमधील आशियाई खेळ आहेत. त्याने एकूण 388 किलो वजन उचलले, ज्यामध्ये ‘स्नॅच’ प्रकारात 176 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील विक्रमाची नोंद केली.

‘सुवर्णपदक हुकण्यासारखे प्रकार घडतात, पण मी कठोर परिश्रम केले आणि त्याचे फळ मला मिळाले आहे. जेव्हा दोन खेळाडू आमनेसामने असतात तेव्हा एकाला पराभव स्वीकारावाच लागतो. आता मी आशियाई खेळांसाठी चांगली तयारी करेन’, असे लवप्रीतने सांगितले. मायदेशी परतल्यावर झालेल्या उबदार स्वागतामुळे आनंदित झालेल्या आणि महिलांच्या 58 किलो वजन गटात कांस्यपदक जिंकलेल्या बिंद्याराणी देवी सोरोखाईबमने सांगितले की, आगामी स्पर्धांसाठी ती आणखी कठोर परिश्रम घेईल.

पुऊषांच्या 60 किलो वजन गटात रौप्यपदक जिंकणाऱ्या ऋषिकांत सिंगने सांगितले की, पुढच्या वेळी तो सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारतासाठी पदक जिंकल्याचा आनंद होत आहे. माझ्या कामगिरीबद्दल मी आधीच बोललो आहे, पण मी अधिक ताकदीनिशी परत येईन आणि आणखी चांगली कामगिरी करेन, असे ऋषिकांत म्हणाला. इंफाळमध्ये जन्मलेल्या आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या या वेटलिफ्टरने आपल्या मूळ राज्यात शांतता राखण्याचे आवाहनही केले. यामुळे क्रीडा गुणवत्तेला अधिक वाव मिळेल, असे त्याने सांगितले.

महिलांच्या 69 किलो वजन गटात दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक जिंकणाऱ्या हरजिंदर कौरने सांगितले की, अहमदाबादमध्ये होणाऱ्या पुढील स्पर्धेत हे पदक सुवर्णपदकात बदलण्याचे तिचे ध्येय आहे. पुऊषांच्या 65 किलो वजन गटात रौप्यपदक जिंकणाऱ्या राजा मुथुपंडीने सांगितले की, अनेक शस्त्रक्रियांचा सामना केल्यानंतर मिळालेले आणि वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमांचे हे फळ आहे. दुसरा रौप्यपदक विजेता वल्लुरी अजय बाबू याने सांगितले की, अटीतटीच्या लढतीतील दडपण हाताळल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्याला लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची आशा आहे.

भारतीय वेटलिफ्टर्सकडून आठ पदकांची कमाई

भारतीय वेटलिफ्टर्सनी आपली मोहीम एकूण आठ पदकांसह (एक सुवर्ण, सहा रौप्य आणि एक कांस्य) पूर्ण केली. भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की, माझ्या खेळाडूंच्या कामगिरीवर मी खरोखरच खूप आनंदित आहे. काही गोष्टींमध्ये आम्ही थोडे मागे पडलो आणि पुढील काळात पदक रौप्यवरून सुवर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही त्यावर काम करू शकतो. पण खेळात असे घडतच असते. एकंदरित निकाल चांगले आहेत, असे ते म्हणाले.

Advertisement

.