For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडामार्गात १५ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

दोडामार्गात १५ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर : आजी-माजी सैनिक संघटना, दोडामार्ग यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी दोडामार्ग तालुक्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, सैनिक परिवार, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
ही तिरंगा रॅली सकाळी १० वाजता तहसीलदार कार्यालय, दोडामार्ग येथून सुरू होऊन गणेश मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. देशभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सर्वांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हातात तिरंगा घेऊन देशभक्तीचा संदेश देत या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रॅलीत तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.