कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावमध्ये भव्य रुद्राक्ष प्रदर्शन-विक्री

12:28 PM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कार्तिक मासनिमित्त हैदराबाद येथील इंडस नेपाळ रुद्राक्ष संस्थेतर्फे बुधवार दि. 29 ऑक्टोबर रोजी टिळकवाडी येथील महालसा ज्वेलर्स बिल्डिंग, कला मंदिर मॉल समोर, शुक्रवार पेठ येथे रुद्राक्षाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शन बुधवारपासून सोमवार दि. 3 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी विविध प्रकारच्या रुद्राक्षांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.

Advertisement

प्रदर्शनामध्ये सिद्धमाळा, जपमाळा, स्पटिकमाळा, तुळशीमाळा, शाळीग्राम, शिवमाळा, ज्ञानमाळा अशा विविध प्रकारच्या रुद्राक्षमाळा ग्राहकांना पाहावयास मिळणार आहेत. एकमुखी रुद्र्राक्षपासून 21 मुखी रुद्राक्षपर्यंत प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत, असे इंडस नेपाळ रुद्राक्ष संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र काशीरेड्डी यांनी सांगितले.

Advertisement

तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्म दिनांकावर आधारित रुद्राक्ष हवे असेल तर त्यासाठी वेदगणित शास्त्रानुसार रुद्राक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी पंचांग अथवा कॉम्प्युटरची आवश्यकता नाही. प्रदर्शनामध्ये विक्री झालेले रुद्राक्ष नकली असल्याचे सिद्ध झाल्यास विकत घेतलेल्या रकमेच्या दोनपट रक्कम देण्यात येणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.

शिवपुराणानुसार रुद्राक्ष माळा घातल्याने जीवनात सुख-समृद्धी, भरभराट होते. रुद्राक्ष धारण करणे शुभदायक आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन रुद्राक्षाची खरेदी करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7097136666 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article