For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हर्षाच्या दुसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन

11:12 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
हर्षाच्या दुसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन
Advertisement

दर्जेदार अन् ब्रँडेड उत्पादने नागरिकांच्या सेवेत : कठोर मेहनत-प्रामाणिकपणामुळे भरभराट

Advertisement

बेळगाव : हर्षा स्टोअरला दर्जेदार आणि ब्रँडेड उपकरणांची परंपरा आहे. त्यामुळे ऑनलाईनच्या जमान्यातही अशा स्टोअरमध्ये ग्राहक प्रत्यक्ष भेट देऊन खरेदीला पसंती देतात. उडुपीसारख्या गावामध्ये प्रथम शाखा निर्माण करून हर्षाने आज भरारी घेतली आहे. हर्षा म्हणजे आनंद, या आनंदोत्सवाची म्हणजेच हर्षा शोरुमची दुसरी शाखा टिळकवाडीत सुरू झाल्याने ग्राहकांची सोय होणार आहे, असे विचार लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केले. हर्षा स्टोअरच्या खानापूर रोडवरील शाखेचे फीत कापून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक सूर्यप्रकाश के., सीईओ अशोककुमार, मार्केटिंग डायरेक्टर हरिष एम., डायरेक्टर सुरेश एम., राजेश एम., लोकमान्यचे व्हा. चेअरमन अजित गरगट्टी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविक करताना मॅनेजिंग डायरेक्टर सूर्यप्रकाश के. म्हणाले, कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे राज्यात हर्षाच्या 19 शाखा कार्यरत आहेत. बेळगाव येथील ग्राहकांच्या प्रतिसादामुळे दुसरी शाखा सुरू झाली आहे. दर्जेदार उत्पादने आणि चांगल्या सुविधांमुळे ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच हर्षाने चांगले नाव केले आहे, असे सांगत हर्षाच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी हर्षा शोरुमचे कुटुंबीय, कर्मचारी, लोकमान्यचे सीईओ अभिजीत दीक्षित, संचालक पंढरी परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हर्षा स्टोअरमध्ये स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट घड्याळ, टॅब, ब्लू टूथ स्पिकर, टीव्ही संच, होम थिएटर, यासह घरगुती साहित्यामध्ये मिक्सर, कुकर, गिझर, फॅन, वॉटर प्युरिफायर, रेग्युलेटर, एअर कंडिशनर आदी दर्जेदार उत्पादने उपलब्ध आहेत.

Advertisement

हर्षाच्या राज्यभरात 19 शाखा

बेळगाव येथे हर्षाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन 2007 मध्ये झाले आहे. त्याबरोबरच राज्यात उडुपी, मंगळूर येथे प्रत्येकी 3, हुबळी येथे 2, धारवाड, कलबुर्गी, बेंगळूर, शिमोगा येथे प्रत्येकी एक यासह इतर ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. याबरोबरच आता बेळगावात दुसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन झाले.

Advertisement
Tags :

.