म्हसवड येथे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या 112 व्या पुण्यतिथी महोत्सवाची भव्य सुरुवात
रुद्राभिषेक व नामस्मरणाने मंदिर परिसर भक्तिभावाने भारावला
म्हसवड : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा ११२ व्यां पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने काल पहाटे श्री ब्रह्मचैतन्य महाराज देवस्थान च्या सर्व विश्वस्थांच्या हस्ते अक्षय बटव्याचे आणि कोठी पूजन मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून येत्या दहा दिवस चालणाऱ्या.या पुण्यतिथी महोत्सवाच्या सोहळ्यास आज पहाटे मोठ्या उत्साहात व आनंदात भक्तिभावाने शेकडो भक्तांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
प्रथम सकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या समाधीवर रुद्राभिषेक करण्यात आला.त्यानंतर सकाळी सव्वा सहा वाजता वेदघोष झाला त्या नंतर इशस्तवन करण्यात आले. त्यानंतर ब्रम्हानंद मंडप या सभागृहात ौअक्षय बटव्याचे पूजन करण्यात आले. तेथे च श्रीं च्या पादुकांना विधिवत अभिषेक करण्यात आला.आरती झाल्या नंतर गोमाता पूजन करण्यात आले.त्यानंतर कोठी मध्ये मोठ्या चुलींचे प्रज्वलन व पूजन विश्वस्थांच्या हस्ते करण्यात आले.
दहा दिवस जेथे प्रसादाचे सर्व पदार्थ येथे बनवले जातात. त्या कोठीचे म्हणजेच मोठ मोठ्या चुलींचे प्रज्वलन करून स्वयंपाक घरात प्रसाद बनवण्यास सुरुवात केली जाते.विविध प्रकारच्या भाज्या,भांडी,धान्य सजवले होते त्याठिकाणी ही ट्रस्टींच्या हस्ते पूजन करण्यात आले.नामस्मरण मंडपात "श्रीराम जयराम जय जय राम "चा सामुदायिक जप करण्यात आला. व उत्सवातील जपाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर मुख्य मंदिरात अखंड नामस्मरण व भजन करून पहारा बसवण्यात आला.त्यानंतर आरती झाल्यानंतर उत्सवाची सुरुवात झाली.हजारो भाविक कोठी पूजनाची नेत्रदीपक मांडणी पाहण्यासाठी उपस्थित होते.वेगवेगळ्या शैलीदार पद्धतीने केलेल्या भाजांच्या मांडणी ने भाविक आनंदून गेले. राम नामाचा जयघोष करत भाविकांनी मंदिर परिसरात प्रसाद मंडपात भाज्यांची व भांड्यांची केलेली आरास पाहण्यासाठी आज सकाळी ऐन थंडीत ही मोठी गर्दी केली. रामनामाच्या भक्तीत भाविक तल्लीन झाले होते.सकाळी साडे दहा वाजता रामपाठ व विष्णू सहस्त्रनाम करण्यात आले.
तुळशीच्या वाळलेल्या काड्याच्या माध्यमातून महाराजाची अप्रतिम मुर्ती कलाकाराने तयार करून अनेक भक्तांचे अकृषण ठरत होते पालखी समाधी मंदिरातून निघून गावातून ग्राम प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात येते हा सोहळा आजपासून दररोज सकाळी दहा वाजता सुरू झाला आहे . मंदिर परिसरात मान्यवरांचे दिवसभर गायन सेवा,भजन,कीर्तन अशी कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. दहा दिवस दररोज रामनाम घेण्यासाठी व गायन,भजन,कीर्तन सेवेचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविक गोंदवले नगरीत दाखल झाले आहेत.दहा दिवस मंदिर परिसरातील विविध मंडपात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सुरू असतात.
मंदिर समिती मार्फत हजारो भाविकांची राहण्याची व दोन वेळच्या महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.सकाळी नाश्ता व दोन वेळेला चहा दिला जातो.येथील सर्व सोयी भाविकांना मोफत पुरवल्या जातात हे येथील मोठे वैशिठ्य होय.