महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तरुण भारत’ ‘घरकुल’ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

11:45 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोटरी क्लब वेणुग्राम-कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असो.तर्फे आयोजन

Advertisement

बेळगाव : आज अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रात दररोज क्रांती होत आहे. तसेच गृह व कार्यालयीन सजावटीला (इंटिरिअर) मोठा वाव आहे. त्यामुळे घरकुलाचे स्वप्न साकारणाऱ्या प्रत्येकासाठी ‘घरकुल प्रदर्शन’ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास रोटरीचे प्रांतपाल शरद पै यांनी व्यक्त केला. ‘तरुण भारत’ पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन आयोजित ‘घरकुल प्रदर्शन’ सीपीएड मैदानावर सुरू झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर शरद पै बोलत होते. व्यासपीठावर सतीश शुगर्सचे उपाध्यक्ष पी. डी. हिरेमठ, अल्ट्राटेक सिमेंटचे उत्तर कर्नाटक आणि गोवा विभागाचे मार्केटिंग हेड वियजकुमार बी., ‘तरुण भारत’चे संपादक विजय पाटील, सीएमओ उदय खाडीलकर, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई, इव्हेंट चेअरमन महेश अनगोळकर, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जी. टी., इव्हेंट चेअरमन महेश अरबोळे उपस्थित होते.

Advertisement

फीत कापून व दीपप्रज्वलन करून शरद पै यांच्या हस्ते ‘घरकुल प्रदर्शन’चे उद्घाटन करण्यात आले. सामूहिक प्रयत्नांतून कोणत्याही योजना व स्वप्ने यशस्वीपणे साकार होतात, याचे प्रत्यंतर घरकुल प्रदर्शनातून येते. घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. याचा लाभ सर्वांनीच घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सतीश शुगर्सचे पी. डी. हिरेमठ यांनी सतीश शुगर्सतर्फे उसाचे गाळप यशस्वीरीत्या सुरू आहेच. आता प्रियाशक्ती, टीएमटी बारचे उत्पादन सुरू असून बांधकामासाठी त्याचा उपयोग होत आहे. गुणवत्ता व दर्जामध्ये तडजोड न केल्याने आज या टीएमटी बारना मागणी वाढली आहे, असे सांगितले.

अल्ट्राटेकचे विजयकुमार म्हणाले, ‘घरकुल’ने प्रत्येक बांधकाम व्यावसायिक व पूरक व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची माहिती देण्यासाठी व्यासपीठ दिले आहे. यापुढेसुद्धा अल्ट्राटेक घरकुल प्रदर्शनामध्ये आपला सहभाग देत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उदय खाडीलकर यांनी, ‘तरुण भारत’ची संकल्पना अरुण कामुले, उमेश सरनोबत व मनोहर वाटवे यांनी सर्वप्रथम उचलून धरली. तेव्हापासून ‘घरकुल’चे यशस्वी आयोजन उपरोक्त तीन संस्था करत आहेत. ‘तरुण भारत’ प्रत्येकाला आपला वाटावा यासाठी समूहप्रमुख डॉ. किरण ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर व रोमा ठाकुर या सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. ‘तरुण भारत’बरोबरच सोशल मीडियालासुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रारंभी रोटरी क्लब वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी स्वागत केले. रोटरी वेणुग्रामचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सेवा तत्त्वावर रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे काम यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले. कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जी. टी. यांनी घरकुलचा हेतू सांगताना 2002 या प्रदर्शनाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. हे 11 वे प्रदर्शन असून येथील उत्पादनांची पाहणी करून ग्राहक आपल्या घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करतात, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्या होय, असे स्पष्ट केले.

शरद पै यांचा परिचय शशीधर यांनी, विजयकुमार बी. यांचा परिचय संजय हंप्पण्णवर व पी. डी. हिरेमठ यांचा परिचय जगदीश पावटे यांनी करून दिला. उद्घाटनानंतर मेथॉडिस्ट चर्चचे पदाधिकारी दिनकर व शांतकुमार यांचा सत्कार महेश अरबोळे यांनी केला. तसेच बँक ऑफ बडोदा, बेंचमार्कचे योगेश, सिद्धार्थ पाईप व मॅग्नेटा आइस्क्रीम या उत्पादन कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनाचे डायमंड प्रायोजक प्रियाशक्ती स्टील, गोल्ड स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट, सिल्व्हर स्पॉन्सर बेंचमार्क फायनान्शियल सर्व्हिसेस व बँक ऑफ बडोदा व व्हेन्यू स्पॉन्सर सिद्धार्थ पाईप कॉर्पोरेशन हे आहेत. सूत्रसंचालन रोटे. अजय पाटील व अमित दोशी यांनी केले. सचिव महेश अनगोळकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला तरुण भारत परिवार, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

26 नोव्हेंबरपर्यंत घरकुल प्रदर्शन

सदर प्रदर्शन मंगळवार दि. 26 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे. शुक्रवार दि. 22 रोजी दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी ‘घरकुल’मध्ये सायंकाळी 7 ते 10 या वेळेत संगीत सुधा हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सागर चंदगडकर व अंतरा कुलकर्णी यांचे गायन होणार आहे. यावेळी मिमिक्री आर्टिस्ट संदीप व संगीत सुधाचे अरुण शिरगापूर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article