For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिव स्वराज्य संघटनेचे थाटात उद्घाटन

10:03 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
शिव स्वराज्य संघटनेचे थाटात उद्घाटन
Advertisement

खानापुरातील शस्त्र प्रदर्शनास मोठा प्रतिसाद : मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांचा वापर करून बुद्धिभेद करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यात बहुजन समाजातील युवक भरकटला जात आहे. यासाठी बहुजन समाजाने यापासून सावध राहून शैक्षणिक धोरण अवलंबावे आणि सुशिक्षित होऊन वेगळा आदर्श निर्माण करावा, असे वक्तव्य समितीचे नेते रमाकांत केंडुसकर यांनी लोकमान्य भवन येथील आयोजित शिव स्वराज्य संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनानिमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

यावेळी स्वागताध्यक्ष रमेश धबाले यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आणि संघटनेच्या उद्देशाविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती समितीचे सचिव मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सीमासत्याग्रही शंकर पाटील, विलास बेळगावकर, युवा समितीचे अंकुश केसरकर, आबासाहेब दळवी, माजी सभापती नंदा कोडचवाडकर, गोपाळ पाटील, जयराम देसाई यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त विविध देवदेवतांचे आणि नेत्यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थितांच्या हस्ते शिव स्वराज्य संघटनेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमावेळी तालुक्यातील विविध मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मालोजी अष्टेकर म्हणाले, शिवरायांचा आदर्श हा कोणत्याही धर्माविरोधात नव्हता. मात्र आज शिवाजी महाराजांचा वापर राजकीय लोक वेगळ्या हेतूने प्रेरित होऊन करत आहेत. यासाठी समाजातील जाणकारांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Advertisement

इतिहास संशोधक सुनील कदम म्हणाले, छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आणि युद्धातील निती ही आजही जगभर अभ्यासली जाते. त्यांची शस्त्रास्त्रे प्रसिद्ध असून या शस्त्रास्त्रावरच त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत. शिवरायांच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून दुर्ग प्रतिष्ठानतर्फे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. या प्रदर्शनात शिवाजी महाराजांच्या विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. तालुक्यातील मराठी भाषिक जनतेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अहोरात्र झटण्याचे अभिवचन शिव स्वराज्य संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी देत आहोत, असे वक्तव्य शिव स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनात तरुण विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रास्त्रे तसेच इतिहासकालीन वस्तू, शिवरायांच्या किल्ल्यांची माहिती यासह ऐतिहासिक दस्तावेज ठेवण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.