महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घरकुल प्रदर्शनाची शानदार सांगता

11:17 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रदर्शनाला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद :  व्हीटीयूच्या कुलगुरुंची समारोपाला उपस्थिती : सांस्कृतिक कार्यक्रमांची रोज मेजवानी

Advertisement

बेळगाव : ‘तरुण भारत’ पुरस्कृत ‘घरकुल 2024’ प्रदर्शनाची मंगळवारी शानदार सांगता झाली. सहा दिवसांत लाखो नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन रियल इस्टेट तसेच गृहनिर्माण क्षेत्राविषयी माहिती जाणून घेतली. मंगळवारी शेवटच्या दिवशीही शेकडो नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन घरासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती घेतली. नागरिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल स्टॉलधारकांनी आभार मानले.‘तरुण भारत’ पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे ‘घरकुल 2024’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

Advertisement

घरासाठी लागणारे प्रत्येक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे बेळगाव तसेच परिसरातील हे एकमेव प्रदर्शन असल्याने हजारो नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. घरासाठी लागणारे सिमेंट, लोखंड, दरवाजे, खिडक्या, किचन ट्रॉली, सोलार, सजावटीच्या वस्तू, टाईल्स, हार्डवेअर, फर्निचर, सोफासेट, इंटिरियर डिझाईन यासह इतर वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. याचबरोबर प्रत्येक दिवशी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती.

मंगळवारी घरकुल प्रदर्शनाची सांगता झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) चे कुलगुरु डॉ. विद्याशंकर एस. व रोटरीचे माजी प्रांतपाल गणेश भट उपस्थित होते. व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जी. टी., तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर, इव्हेंट चेअरमन महेश आरबोळे, नरेश कलगोड उपस्थित होते. रोटे. अश्विनी पाटील हिने सांगता समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गणेश भट यांनी आयोजकांना शुभेच्छा देत अशी प्रदर्शने वरचेवर भरवत राहावीत. यामुळे स्टॉलधारकांना व्यवसाय वाढीसाठी मदत तर होतेच त्याचबरोबर नागरिकांच्याही ज्ञानात भर पडते, असे विचार त्यांनी मांडले.

व्हीटीयूच्या कुलगुरुंकडून प्रशंसा

डॉ. विद्याशंकर एस. यांनी तरुण भारत घरकुल प्रदर्शनाचे कौतुक केले. मोठ्या महानगरांमध्ये कन्स्ट्रक्शन- संदर्भात प्रदर्शने भरतात. परंतु घरकुल प्रदर्शनामुळे बेळगावसारख्या लहान शहरातील नागरिकांनाही नवीन तंत्रज्ञानाची माहिती होत आहे. घरकुल प्रदर्शनात अनेक नवीन तंत्रज्ञान, साहित्य उपलब्ध असल्याने घराचे बांधकाम करताना या बाबींचा नक्कीच विचार होईल, असे ते म्हणाले. स्टॉलधारकांनी मनोगत व्यक्त करत घरकुल प्रदर्शनामुळे अनेक ग्राहकांशी संवाद साधता आल्याबद्दल आभार मानले. वैजनाथ चौगुले, संजीव देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रदर्शनासाठी सहकार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. महेश आरबोळे यांनी आभार मानले. यानंतर निवेदार्पणा अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सदस्यांनी हिंदी, मराठी व कानडी गीतांचा नजराणा सादर केला. यामध्ये किरण कुलकर्णी, आशा देशपांडे, सुजीत जोशी, रोहीत किणी यांनी विविध गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पट्टणशेट्टी यांनी केले. यावेळी तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

विविध विभागातील विजेत्यांचा गौरव

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही बेस्ट स्टॉलची निवड करण्यात आली. लहान स्टॉल विभागात प्रथम- नोरीसिस, द्वितीय- फॅबटेक इंजिनिअरिंग, तृतीय- आनंद इन्फ्रास्ट्रक्चर्स, मोठ्या स्टॉल विभागात प्रथम- क्रोमाटिका किचन, द्वितीय- हेडा प्लायवूड, तृतीय-नॅचरल स्टोन्स व अलोफ स्टुडिओ यांनी क्रमांक मिळविले. सर्व स्टॉलधारकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचबरोबर डिप्लोमा व इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना गौरविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article