शिल्पकार जयदीप आपटेंना लपवण्यामागे महायुतीचे सरकार
मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री मालवणात पाहणीसाठी का आले नाहीत ; सतीश सावंतांचा सवाल
सावंतवाडी प्रतिनिधी
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागितली. पण ,जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली आहे का ? पुतळा ज्यांनी बनवला ते जयदीप आपटे कुठे दुबईला गेलेले नाहीत तर, ते मुंबईतच आहेत. त्यांना लपवण्यामागे हे महायुतीचे सरकार आणि मंत्री जबाबदार आहेत. मालवण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करण्यासाठी का आले नाहीत असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला केला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध करत आहोत. येत्या गणेश चतुर्थी पूर्वी जर का शिल्पकार आपटे यांना गृह विभागाने शोधून काढून अटक न केल्यास महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल असेही त्यांनी स्पष्ट केले. श्री केसरकर हे सोयीनुसार दहशतवाद संपला असे भाष्य करत आहेत. मग, मालवण येते खासदार नारायण राणे यांनी घरात घुसून मरेपर्यंत मारेन असे ते वक्तव्य केले ते त्यांच्या स्वभावानुसार केले असून पोटात जे होतं ते ते बोलले. मग हा दहशतवाद नाही का ? येथील जनतेला आता जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासमोर खासदार यांनी जे वक्तव्य केले त्यानुसार त्यांच्यावर सुमोटो लावणे आणि तसा गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे .आमदार नितेश राणे हे ज्या पद्धतीने बोलता आहेत मग आता केसरकर यावर काय बोलणार आहेत. असा सवालही त्यांनी केला. श्री केसरकर यांनी शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजवले आहेत. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बांधकाम विभागाबद्दल जी वक्तव्य केलीत त्याला आमचा पाठिंबा असून जर एका राजकीय नेत्याविरोधात बांधकाम विभाग अशी भूमिका घेत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मायकल डिसोजा , शैलेश गवंडळकर,उत्तम लोके ,विनायक ठाकूर आधी उपस्थित होते.