For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूरमध्ये भव्य रथ मिरवणूक

04:05 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूरमध्ये भव्य रथ मिरवणूक
Advertisement

                    सोलापूरमध्ये सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची रथ यात्रा

Advertisement

सोलापूर : 'सद् गुरू नाथांचा जयजयकार जयजयकार....', 'जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रम्ह सद् गुरू' च्या अखंड जयघोषात हजारो भाविकांनी रथ ओढत भक्तिमय वातावरणात उत्साहात रथ मिरवणूक काढली. निमित्त होते श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथीचे.

परंपरेप्रमाणे श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी सोलापूर शहर परिसरातून रथ मिरवणूक झाली. या मिरवणुकीचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि त्यांच्या धर्मपत्नी वैशाली पोमण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी, पोलिस निरीक्षक अमोल मिसाळ, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाकचौरे, रवी गुंड, सुभाष बद्दूरकर, सम्राट राऊत प्रभाकर कुलकर्णी, रमेश देशमुख, प्रकाश कोथिंबीरे, दत्तात्रय कुसेकर, सम्राट राऊत, रामभाऊ कटकधोंड, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे परशुराम होटकर, प्रमोद महिंद्रकर, राहुल नल्ला, मल्लिनाथ व्हटकर आदी उपस्थित होते.

Advertisement

भक्तिमय वातावरणात झालेल्या आरती आणि पालखी पूजेनंतर रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेली बैलगाडी होती. त्या बैलगाडीत सनई चौघडा तर त्यामागे बँड पथक होते. त्यामागे सजवलेल्या बग्गीत श्री सदगुरु प्रभाकर स्वामी महाराज, श्री सद् गुरू दिगंबर इनामदार गुरुजी, श्री गुरू यशोदामाई इनामदार, श्री सद् गुरू रघुनाथ प्रिय स्वामी महाराज, श्री गुरू बसपय्या स्वामी महाराज, श्री गुरुलिंग जंगम स्वामी महाराज, श्री सद् गुरुनाथ उमदी भाऊसाहेब महाराज, श्री सद् गुरू गोधडचे स्वामी महाराज, श्री सद् गुरुनाथ तिकोटीकर महाराज, श्री माणिकप्रभू महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री रामदास स्वामी महाराज यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. त्यामागे अखंड भजन म्हणणारे भक्तांचे भजनी मंडळ विविध भजने सादर करत होते. त्यामागे सुंदर सजावट केलेल्या पालखीत श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची प्रतिमा आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या. सर्वांत शेवटी

श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची मूर्ती असलेला, सजवलेला रथ भाविकांकडून दोराच्या सहाय्याने ओढला जात होता. परंपरेप्रमाणे संपूर्ण मिरवणूक मार्गावर हा रथ भाविकांनी ओढला. सम्राट चौकातील श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून सुरुवात झालेली ही मिरवणूक नीला नगर येथे आल्यानंतर परंपरेप्रमाणे परमपूजनीय श्री इनामदार गुरुजी यांच्या घराजवळ रथाची पूजा करण्यात आली. तेथून ही मिरवणूक बाळीवेस, चाटी गल्ली, कुंभार वेस, महात्मा श्री बसवेश्वर महाराज मूर्ती, कन्ना चौक, राजेंद्र चौक उद्योग बँक, साखर पेठ, समाचार चौक, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौकमार्गे नवी पेठ येथील श्रीराम मंदिराजवळ आली. या ठिकाणी रथाला परंपरेप्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात येऊन श्रीरामाची आरती करण्यात आली. यानंतर गंगा विहीर, चौपाड येथील श्री बालाजी मंदिर, माळी गल्ली, लोणार गल्ली, पत्रा तालीम, छत्रपति श्री शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ, सम्राट चौकमार्गे हा रथ मिरवणुकीने पुन्हा सद् गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात आला. यानंतर आरती, शेजारती आणि भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Advertisement
Tags :

.