अत्यंत चुरशीच्या लढतीत गणेशवाडीच्या सरपंचपदी सारिका माने विजयी
कसबा बीड वार्ताहर
करवीर तालुक्यातील गणेशवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीत झाली. यामध्ये प्रभागवार इर्षेने ही निवडणूक लढविण्यात आली. कुंभी कासारी संचालक व माजी सरपंच दादासो लाड व माजी पोलीस पाटील राणोजी माने यांचे नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास आघाडी आणि नामदेव एकल व इतर यांच्या नेतृत्वाखाली भावेश्वरी ग्राम विकास आघाडी यामध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत सरपंच पदासाठी असणारे माणकू दिनकर माने विरुद्ध सारिका शिवाजी माने हे उमेदवार होते. यामध्ये माणकू माने यांना 766 मते , तर सारिका शिवाजी माने यांना 805 मते पडली. 39 मतांच्या लिडने सारीका माने लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या.त्यांच्या निवडीचे पत्र निवडणूक अधिकारी यांच्याकडून त्यांना प्रदान करण्यात आले.
गणेशवाडी येथे एकूण मतदान 95.34% इतके झाले होते. कोण निवडून येणार ? कोण हरणार ? तसेच सरपंच कोण होणार ? याची उत्कटता लागून राहिली होती. आज सकाळी निकाल जाहीर होताच यामध्ये जनसेवा ग्राम विकास आघाडीचे लोकनियुक्त सरपंच व 6 उमेदवार आणि भावेश्वरी ग्रामविकास आघाडीस 4 उमेदवार निवडून आले यापैकी बिनविरोध शोभा निवृत्ती माने यांची निवड झाली आहे.
यावेळी माजी सरपंच दादासो लाड व यांनी आपण केलेली विकास कामे नागरिकारांच्या पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्याने नागरिकांनी आम्हाला परत संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासास असेच नेहमी पात्र राहू व विकासकामे करू असे सांगितले. यावेळी नुतन लोकनियुक्त सरपंच सारिका माने व विजयी सर्व उमेदवार ,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .
गणेशवाडी येथे विजयी झालेले उमेदवार खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 .संतोष आत्माराम माने,विलास आनंदा यादव,शकुंतला तानाजी मेढे,
प्रभाग क्रमांक 2 . तानाजी राऊसो माने ,सारिका संभाजी सुतार, अंबिका महेश माने
प्रभाग क्रमांक 3 . संगीता सुरेश दुर्गुळे, प्रकाश नानासो माने , शोभा निवृत्ती माने