तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरणात ग्रामसेवकाला अटक
03:52 PM Jan 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी प्रतिनिधी
Advertisement
तळवडे ग्रामपंचायत शासन निधीचे सुमारे ७२ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी तथा तळवडे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक नामदेव रामचंद्र तांबे ( वय ४४, सध्या रा. गरड सावंतवाडी, मूळ रा. कुपवडे, तालुका कुडाळ ) याचा उच्च न्यायालय मुंबई कोर्टातून जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे . पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून व सादर केलेल्या पुराव्यावरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर योग्य पुरावा प्राप्त झाल्यावर ग्रामसेवक तांबे यास अटक करून सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे .तर दुसरा संशयित ठेकेदार आरोपी प्रथमेश कमलाकर धुरी वय - २७, रा. बांदा याला अटक करण्यात आली आहे.अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली
Advertisement
Advertisement