For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रा.पं. मालमत्तांच्या सर्व्हेक्षणानंतर कर वाढ?

06:27 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रा पं  मालमत्तांच्या सर्व्हेक्षणानंतर कर वाढ
Advertisement

नवीन पिटू तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर वसुलीत पारदर्शकता

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

ग्राम पंचायत व्याप्तीमधील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करुन त्याची नव्या पीटू तंत्रज्ञानांतर्गत अपडेट करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. यामुळे ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये असणाऱ्या मालमत्तांचा कर वाढ होणार असल्याची शक्यता जि.पं. अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

अनेक वर्षांपासून ग्राम पंचायत व्याप्तीमधील मालमत्तांची कर वाढ करण्यात आलेली नाही. अनेक विकासाभिमुक योजना राबविण्यासाठी सरकारकडे निधीची कमतरता भासत असल्याने नवीन तंत्रज्ञानानुसार मालमत्ता वाढविण्याची अधिक शक्यता असल्याचे सांगण्यात येतआहे. या माध्यमातून ग्राम पंचायतींना आवश्यक महसुल उपलब्ध करुन देवून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसह इतर विकास कामांसाठी हा निधी उपयोग करण्यास मदतीचा ठरेल, या उद्देशाने ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील वेगवेगळ्या मालमत्तांचा कर वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ग्राम पंचायतीच्या महसुलात वाढ होवून ग्राम पंचायतीचा कारभार या महसुलावर चालविण्याची सरकारची योजना आहे.

ग्राम पंचायतीचा कर वाढल्यास सदर निधी सरकारच्या खात्यावरच जमा होणार. मात्र त्याचा उपयोगही ग्राम पंचायतींनाच होणार आहे. अनेक वर्षांपासून मालमत्तांचा कर वाढ झाला नसल्याने सर्व्हेक्षण करुन कर वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कर वसुलीसाठी अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वसुल केलेला कर ऑनलाईनव्दारेच सरकारच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे अधिक पारदर्शकता येणार असून कर वसुली प्रणाली अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तालुका पंचायत, ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहेत. 100 टक्के कर वसुलीचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.