For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोषींवर कारवाई न केल्यास ग्रा. पं. ला टाळे

12:44 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोषींवर कारवाई न केल्यास ग्रा  पं  ला टाळे
Advertisement

बिजगर्णी ग्रामस्थांचा भ्रष्टाचारप्रकरणी इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव  : तालुक्मयातील बिजगर्णी ग्रामपंचायतीमध्ये विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करूनही संबंधित माहिती न दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा 27 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात, सदर प्रकाराबाबत 30 जुलै 2025 रोजी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत अर्ज दाखल केला होता. मात्र आजपर्यंत कोणतीही माहिती देण्यात दिली नाही. याबाबत वारंवार चौकशी करूनही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत आहे. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारासंदर्भात पुराव्यांसह अनेक तक्रारी ग्रा. पं. कार्यालय, लोकपाल कार्यालयाकडे सादर केल्या. मात्र या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नाराजी वाढली आहे.

Advertisement

सोशल मीडियावरही चर्चा

या प्रकरणाची चर्चा सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांत सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन  बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकार परिषदेत त्यांनी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या बाबी उघडपणे मान्य केल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे. 26 मार्च 2026 रोजी माहिती आयोगासमोर झालेल्या अपील सुनावणीदरम्यान सुवर्ण विधानसौध येथे संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जाशी संबंधित नसलेली माहिती सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कामावरून काढून टाकण्याची महिला मजुरांना धमकी

याशिवाय मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे 1,000 ते 1,200 मजुरांकडून प्रत्येकी 2,000 ऊ. जबरदस्तीने वसूल केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. प्रसंगी कामावरून काढून टाकण्याची व पाणी बंदची धमकी देऊन ही वसुली केली. या प्रकरणावर बोलू नये म्हणून व्हॉट्सअॅप ग्रुपवर धमक्मया दिल्याचेही समोर आले आहे. संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरणाला अधिकच गंभीर वळण लागले आहे. बिजगर्णी ग्रा.पं. तील कथित भ्रष्टाचार, माहिती अधिकाराचा भंग, प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नाराजी असून, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

Advertisement
Tags :

.