बहिणींच्या सहकार्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याची 200 बहिणींना भाऊबीजेची भेट
शिरोली दुमाला गावचे सुरज पाटील यांचा कौतुकास्पद उपक्रम
कसबा बीड प्रतिनिधी
शिरोली दुमाला ता करवीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली . या निवडणुकीमध्ये सदस्य सूरज नारायण पाटील हे त्यांच्या प्रभागातून निवडून आले. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत सरदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही ग्राम विकास आघाडीचे 6 सदस्य निवडून आले.ही झालेली निवडणूक प्रभागातील सर्व महिलांनी त्यांच्या हाती घेतली होती.प्रभागातील माता भगिनींच्या सहकार्याने सुरज नारायण पाटील,अरुण पाटील , सागर घोटणे, गायत्री सुभेदार , वैशाली परीट व नीता पाटील या 6 सदस्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिले.
या विजयामध्ये गावातील सर्व नागरिक सुज्ञ मतदार व माता-भगिनी यांच्या प्रेमातून उतराई व्हावे या हेतूने भाऊबीजेला हळदी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला.या निमित्ताने सर्व महिला भगिनींना आमंत्रित करण्यात आले होते व त्यांचा विशेष सन्मान म्हणून 200 महिलांना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरज नारायण पाटील म्हणाले माझ्या प्रभागातील ग्रामस्थ व महिलांनी जो आपलेपणा या भावाला देऊन निवडून दिले तो जिव्हाळा कायमस्वरूपी राहावा यासाठी भावा-बहिणींचे नाते असेच वृद्धींगत होणे गरजेचे आहे.यापुढेही असा स्नेह जपूया असे त्यांनी आपल्या मनोगतत सांगितले.
यावेळी लोकशाही ग्रामविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख सरदार पाटील ,नारायण पाटील , रामचंद्र पाटील , गजानन सुभेदार ,दिलीप देशमुख , बजरंग कांबळे व लोकशाही ग्रामविकास आघाडीचे विजयी सर्व सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.