For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या

12:12 PM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या
Advertisement

विजापूर येथील घटना : फरार हल्लेखोरांचा पेलिसांकडून शोध सुरू

Advertisement

विजापूर : अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ग्रामपंचायत सदस्याची भीषण हत्या झाल्याची घटना विजापूर शहराबाहेरील अलियाबाद औद्योगिक वसाहत परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली आहे अलियाबाद ग्रामपंचायत सदस्य तसेच पांगारूण दोड्डी येथील रहिवासी राजू करे (वय 48) असे मृताचे नाव आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, राजू करे हे त्यांच्या वाहनातून जात असताना हल्लेखोरांनी टिप्पर वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर जीपवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. जीपचा दरवाजा उघडत नसल्याने आरोपींनी जीपवर दगड टाकले. या भीषण हल्ल्यात राजू करे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हत्येमागे पूर्व वैमनस्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.