For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाआवास योजनेत आमशी ग्रामपंचायत करवीरमध्ये अव्वल स्थानी! पी. एन. पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

05:17 PM Feb 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
महाआवास योजनेत आमशी ग्रामपंचायत करवीरमध्ये अव्वल स्थानी  पी  एन  पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
Advertisement

सांगरुळ / वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या तालुकास्तरीय महाआवास अभियान कार्यशाळा अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार म्हणून आमशी ग्रामपंचायतीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच आरती सावंत यांच्यासह उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी अशोक कांबळे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर उपस्थित होते.

Advertisement

करवीर पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास योजनेचे व रमाई आवास योजनेचे काम 100% पूर्ण करून इतर तालुक्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. शाहू स्मारक कोल्हापूर येथे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांचे हस्ते सन २०२१-२२ व सन २०२२-२३ सालातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील उत्कृष्ट घरकुल,उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट क्लस्टर लाभार्थी व ग्रामपंचायतीना पुरस्कार तसेच मोदी आवास योजनेचे व रमाई आवास योजनेचे लाभार्थी याना कार्यारंभ आदेश देण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी विजय यादव,माजी सभापती मंगल पाटील,माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी ,माजी उपसभापती सागर पाटील,माजी उपसभापती सुनिल पोवार,बाजार समिती अध्यक्ष भरत पाटील, पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील,शोभा राजमाने ,कृष्णात धोत्रे, कक्ष अधिकारी ,शिंदे आदिसह घरकुल विभागाचे विस्तार अधिकारी (सां)भास्कर जगताप, कनिष्ठ लेखाअधिकारी सुनील बंडगर, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता किशोर पाटील, अनुज रणभुसे, अनिकेत चौगले,, ऋतुराज जगताप, साईराज पाटील, वरिष्ट सहाय्यक भारती फडणीस, संगणक कनिष्ठ सहाय्यक निलीमा जाधव, वरिष्ठ सहाय्यक अनिल पाटील आदिसह तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, लाभार्थी उपस्थित होते.आभार सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.