For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच

06:16 AM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच
Advertisement

वॉर्ड रचना, आरक्षण निश्चिती पूर्ण : आता निवडणूक आयोग उचलणार पावले

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

राज्यातील 5,864 ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला  दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी पुढील पावले उचलणे हा राज्य निवडणूक आयोगावर सोडून दिलेला मुद्दा आहे, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला कळवले आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची दाट शक्मयता आहे.

Advertisement

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनू शिवरामन आणि न्यायमूर्ती टी. पी. विवेकानंद यांच्या पीठाने राज्य निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर  सुनावणी केली. ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी वॉर्डांची संख्या आणि जागांचे आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी आयोगाने या याचिकेद्वारे केली होती.

सुनावणीवेळी राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल प्रतिमा होन्नापूर यांनी, ग्रामपंचायतींसाठी वॉर्ड रचना आणि आरक्षण निश्चिती पूर्ण झाली आहे. पुढील कार्यवाही करणे हा मुद्दा राज्य निवडणूक आयोगाच्या हातात आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र 8 सप्टेंबर 2026 रोजी दाखल करण्यात आले होते. आरक्षण निश्चित झाल्यामुळे ही याचिका आता निरर्थक ठरली आहे.

राज्य सरकारने आवश्यक काम पूर्ण केल्यामुळे याचिका निरर्थक ठरली आहे. आता पुढील आवश्यक पावले उचलणे हे राज्य निवडणूक आयोगाचे काम आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच, अतिरिक्त अॅडव्होकेट जनरलांचे म्हणणे नोंदवून घेतल. निवडणूक आयोगाच्या विनंतीवरून सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

Advertisement
Tags :

.