कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ग्राम पंचायत ई सुनावणी’

04:41 PM Mar 29, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा ऑनलाईन अभिनव उपक्रम : वेळ, पैशाची बचत

Advertisement

कोल्हापूर

Advertisement

विविध प्रकारच्या तक्रारीसंदर्भातील सुनावणीवेळी पक्षकारांना वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागू नये, यासाठी ‘ग्राम पंचायत ई सुनावणी’ सुरू केली आहे. सुकर जीवनमान (नाविन्यपूर्ण) विषयांबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी १७ प्रकरणांवर तर यापूर्वी १८ प्रकरणांवर अशा एकूण ३५ प्रकरणांवर आतापर्यंत ई सुनावणी घेण्यात आली आहे. यावेळी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पक्षकारांना आपापल्या गावातच ग्रापंचायतीत उपस्थित राहून सुनावणीत सहभागी होता येते. या सुनीवणीसाठी आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच दाव्याबाबतच्या कागदपत्रांची संचिका वेबसाईटवर ‘ग्राम पंचायत ई सुनावणी’ या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वेळ व पैसा दोन्हीची बचत होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य, पक्षकार, विधीज्ञ व नागरिकांनी या नाविन्यपूर्ण ई सुनावणी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

संपूर्ण सुनावणी प्रक्रियेसाठी ग्रामस्तरावर संबंधित ग्रामविकास अधिकारी यांची समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. ई- सुनावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक ती व्यवस्था संबंधित ग्रामविकास अधिकारी करतात. प्रकरणातील उभय पक्षकार, विधिज्ञ, संबंधित शासकीय अधिकारी यांनी आपले पुरावे किंवा दस्तऐवज (झेरॉक्स, फोटो, इ. स्वरुपात) ऑनलाईन अध्यासी अधिकारी यांच्यासमोर सादर करणे शक्य होते. सुनावणी वेळी संबंधित उभय पक्षकार/विधिज्ञ यांना लेखी युक्तीवाद / कागदपत्रे सादर करावयाची असल्यास, त्यांनी मोबाईल नंबर ९०२२४०६४९४ वर अपलोड केले जातात. सुनावणी दरम्यान उभय पक्षकार व विधिज्ञ यांना संचिकेचे अवलोकन करता यावे यासाठी डिजिटल स्वरुपात विवाद अर्जाची मुळ संचिका व सुनावणी वेळी उभय पक्षकार/विधिज्ञ यांच्यामार्फत दाखल कागदपत्रे संकेतस्थळावर (ग्रामपंचायत ई-सुनावणी) या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात येते.

अशी होते ई सुनावणी
अर्ध-न्यायिक प्रकरणांची यादी संबंधित संगणक प्रणालीवर विधिज्ञ व संबंधित उभय पक्षकार किंवा ग्रामविकास अधिकारी यांचे व्हाट्स अॅप क्रमांक व विधिज्ञांच्या व्हाट्स अॅप ग्रुपवर ऑनलाईन स्वरुपात आगाऊ स्वरुपात प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये संबंधित प्रकरणांची माहिती, तारीख, वेळ आणि विधिज्ञ यांची माहिती देण्यात येत आहे. तसेच उभय पक्षकार किंवा विधिज्ञ यांना प्रकरणाच्या सुनावणी कामी नोटीस ऑनलाईन स्वरुपात व्हॉट्स अॅपद्वारे मोबाईलवर पाठविण्यात येते. ऑनलाईन सुनावणीसाठी व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत असून त्याबाबतची वेब लिंक किंवा मीटिंग आयडी संबंधित पक्षकार व विधिज्ञ, संबंधित शासकीय अधिकारी यांना आगाऊ स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येते.

ऑनलाईन दावे, युक्तीवाद सादर
सुनावणीवेळी प्रकरणातील उभय पक्षकार, विधिज्ञ, संबंधित शासकीय अधिकारी यांना ऑनलाईन स्वरुपात उपस्थित राहून अध्यासी अधिकारी यांच्या समोर आपले दावे, युक्तिवाद व पुरावे सादर करणे शक्य होत आहे. संबंधित सर्व अर्जदार किंवा सर्व प्रतिवादी हे त्यांच्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समवेत ग्रामपंचायत कार्यालय येथे ऑनलाईन उपस्थित राहतात.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article