For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामपंचायत पोटनिवडणूक 8 मार्चला

04:31 PM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्रामपंचायत पोटनिवडणूक 8 मार्चला
Advertisement

पणजी : गोवा राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी राज्यातील 14 पंचायत प्रभांगाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विविध तालुक्यातील 14 पंचायत प्रभागांची पोटनिवडणूक 8 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार आहे. 9 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. बुधवार 18 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. सोमवार 16 फेब्रुवारीपासून ज्या प्रभागांसाठी निवडणूक होत आहे, त्याच भागापुरती आचारसंहिता लागू झाली आहे.

Advertisement

पोटनिवडणुकीतील पंचायत प्रभाग

  • पेडणे तालुका : चांदेल-हसापूर ग्रामपंचायत प्रभाग 1 रिक्त (प्रजय मळिक यांचा राजीनामा), मांद्रे पंचायत प्रभाग 5 रिक्त (तारा हडफडकर यांचा राजीनामा)
  • डिचोली तालुका : पिळगाव पंचायत प्रभाग 7 रिक्त (उज्वला बेतकेकर यांचा राजीनामा), लाटंबार्से पंचायत प्रभाग 3 रिक्त (पद्माकर मळिक हे जिल्हा पंचायतीत विजयी).
  • बार्देश तालुका : पिळर्ण-मार्रा पंचायत प्रभाग 1 रिक्त (रेश्मा बांदोडकर जिल्हा पंचायतीत विजयी), सिरसई पंचायत प्रभाग 6 रिक्त (नितेश कांबळी यांचा राजीनामा), साल्वादोर द मुंद पंचायत प्रभाग 2 रिक्त (संदीप साळगावकर हे जिल्हा पंचायतीत विजयी). कांदोळी पंचायत प्रभाग 1 रिक्त (अॅन्सितो फर्नांडिस यांचे निधन)
  • सासष्टी तालुका : आके-बायश पंचायत प्रभाग 6 रिक्त (फ्लोरियानो फर्नांदेद यांचा जिल्हा पंचायतीत विजय)
  • फोंडा तालुका : बोरी पंचायत प्रभाग 1 रिक्त (डोमिंगो वाझ यांचे निधन), वेलिंग - प्रियोळ - कुंकळ्ळी पंचायत प्रभाग 3 रिक्त (आदिती गावडे यांचा जिल्हा पंचायतीत विजय), भोम-अडकोण पंचायत प्रभाग 3 रिक्त (सुनील जल्मी यांचा जिल्हा पंचायतीत विजय)
  • केपे तालुका : बाळ्ळी पंचायत प्रभाग 3 रिक्त (संजय वेळीप यांचा जिल्हा पंचायतीत विजय).
  • काणकोण तालुका : लोलये-पोळये पंचायत प्रभाग 8 रिक्त (अजिता लोलयेकर यांचा जिल्हा पंचायतीत विजय).
Advertisement
Advertisement
Tags :

.