वक्फ बोर्ड निधीचा जीआर रद्द
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटमधून जीआर रद्द केल्याची माहिती
मुंबई
राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून गुऊवारी 28 नोव्हेंबर 2024 रोजी शासन निर्णय जारी करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी 10 कोटी ऊपयांचे अनुदान निधी दिला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले.
मात्र हा निधी देण्यात आला असल्याचे वृत्त समाज माध्यमांवर पसरल्यानंतर भाजपाचे प्रक्ते केशव उपाध्ये यांनी यांची दखल घेत हा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतल्याचे सांगितले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय घेऊच शकत नसल्याचे सांगत या प्रकाराची चौकशी होणार असल्याचे ट्विट केले यानंतर 24 तासात महाराष्ट्र सरकारने एक हा निर्णय मागे घेतला आहे. वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक होती. अशी माहिती मुख्य सचिव सुजिता सौनिक यांनी देत ती चूक तत्काळ दुऊस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती सचिवांनी दिली.
दरम्यान महायुती सरकारकडून वक्फ बोर्डाला 10 कोटी ऊपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली असून संबंधित शासन निर्णयही जारी करण्यात आला असल्याचे वृत्त पसरले. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाला 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 20.00 कोटी ऊपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे निर्णयात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट :
राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने जीआर काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तात्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल. असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.